Ticker

6/Breaking/ticker-posts

Apple ला मागे टाकत Xiaomi बनली जगातील दुसरी सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी, नंबर-१ वर ‘ही’ कंपनी

 

*शाओमीने Apple ला टाकले मागे.

*शाओमीच्या शिपमेंटमध्ये ८३ टक्के वाढ.

*पहिल्या क्रमांकावर सॅमसंग कायम.



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नवी दिल्ली : टेक कंपनी शाओमीने यावर्षी दुसऱ्या तमाहीत टेक्नोलॉजी सेक्टरमधील दिग्गज Apple ला मागे टाकले आहे. आता शाओमी जगातील दुसरी सर्वात मोठी स्मार्ट्फोन कंपनी बनली आहे. Canalys रिसर्चच्या रिपोर्टनुसार,  चीनी कंपनी शाओमीच्या शिपमेंटमध्ये ८३ टक्के वाढ पाहायला मिळाली. स्मार्टफोन शिपमेंटबद्दल सांगायचे तर पहिल्यांच शाओमी जागतिक पातळीवर टॉप-२ मध्ये पोहचली आहे. याआधी टॉप-२ स्थानांवर सॅमसंग आणि अ‍ॅपलचा कब्जा होता.

ह्युवावेने काही महिन्यांपूर्वी अ‍ॅपलला मागे टाकत दुसरे स्थान मिळवले होते. मात्र, त्यानंतर कंपनीला अमेरिकेत निर्बंधांचा सामना करावा लागल्याने ह्युवावे हाय-एंड प्रीमियम फोन मार्केटमधून बाहेर पडली.

ही कंपनी क्रमांक-१ वर

नुसार, सॅमसंग वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत १९ टक्के हिस्सेदारीसह जागतिक स्तरावर सर्वात मोठी कंपनी आहे. तर शाओमीची बाजारातील हिस्सेदारी १७ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

Apple  १४ टक्के बाजार हिस्सेदारीसह तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच, स्मार्टफोन शिपमेंटमध्ये ओप्पो आणि विवो १० टक्के बाजार हिस्सेदारीसह चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे.

कॅनालिसचे रिसर्च मॅनेजर बेन स्टँटन म्हणाले की, शाओमीचे सरासरी मूल्य सॅमसंग आणि अ‍ॅपलच्या तुलनेत क्रमश: ४० टक्के आणि ७५ टक्के आहे. कंपनी आपले हाय एंड डिव्हासेस जसे की एमआय ११ अल्ट्राची विक्री वाढवण्यात यशस्वी ठरली आहे. शाओमी आपले प्रतिस्पर्धी ओप्पो आणि विवो सारख्या कंपन्यांपासून कसे वाचते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कारण, ओप्पो आणि विवो देखील कमी किंमतीत हाय-एंड स्मार्टफोन्सची विक्री करत आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या