Ticker

6/Breaking/ticker-posts

कर्जत पोलिसांची कामगिरी: सव्वाचार लाखाचे 21 मोबाईल जप्त; तिघे जेरबंद

 

*कर्जत पोलिसांनी जप्त केले 4,20,000 रु किमतीचे चे 21 मोबाईल..

 *मोबाईल शॉपी फोडून मोबाईल चोरी करणारे 3 चोरटे अटक..

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 कर्जत : कर्जत तालुक्यातील  धालवडी येथील प्रगती मोबाईल शॉपीचे शटर उचकटून दुकानातून 5,20,000 रु किमतीचे 26 नवीन मोबाईल चोरून नेल्या प्रकरणी दाखल गुन्हयातील आरोपींचा माग काढून त्यांना मुद्दे मालासह जेरबंद करण्याची धडकेबाज कामगिरी कर्जत पोलिसांनी केली आहे .

 याबाबत अधिक माहिती अशी की , प्रमोद पोपट चव्हाण राहणार धालवडी तालुका कर्जत यांच्या कुळधरण येथील प्रगती मोबाईल शॉपीचे शटर उचकटून, फोडून दुकानातून 5,20,000 रु किमतीचे 26 नवीन मोबाईल चोरीला गेल्याची फिर्याद दिली होती . त्यानुसार पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर ठिकाणी पोलीस अधिकारी आणि जवान यांनी भेट देउन सदरचा गुन्हा उघड करणे बाबत प्रयत्न सुरू करण्यात आले.

 पोलीस अधिकारी आणि जवान परिसरातील गुन्हेगार चेक करत असतानाच गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरची मोबाईल शॉपीची घरफोडी ही आष्टी, जिल्हा बीड तसेच बेनवडी, तालुका कर्जत आणि करमाळा येथील आरोपींनी केली आहे॰ आणि आता ते आरोपी चीलवडी गावचे शिवारात वीटभट्टीवर काम करत आहेत. तात्काळ पोलीस अधिकारी कर्मचारी यांना सदर ठिकाणी जाऊन सापळा लावून संशयित पप्पू सर्जेराव गायकवाड, (वय 25 वर्ष, रा. धामणगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड),सुरज बाळु गायकवाड,(वय 20 वर्ष, रा बेनवडी, ता कर्जत) यांना ताब्यात घेऊन कसून विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. तसेच सोबत आणखी खडकी ता. करमाळा येथील दोन जोडीदार आहेत, असे संगीतिले  त्यानुसार पोलिसांनी खडकी येथे जाऊन विकास कैलास घोलवड, (रा. खडकी, ता. करमाळा) यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक  सौरभकुमार अग्रवाल , कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव  यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव , सहाय्यक पोलीस निरीक्षीक सुरेश माने, पोसई भगवान शिरसाठ, पोलीस अंमलदार अंकूश ढवळे, सुनिल माळशिखरे, पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, सुनिल खैरे, गोवर्धन कदम, अमित बर्डे, गणेश भागडे, सागर म्हेत्रे, शकिल बेग, विकास चंदन, नितीन नरुटे यांनी केली.

सर्व आरोपींकडून गुन्ह्यातील  चोरी केलेल्यापैकी  4,20, 000 रु किमतीचे  एकूण 21 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस अमलदार सुनील माळशिखरे, भाऊसाहेब यमगर, विकास चंदन हे करत आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या