Ticker

6/Breaking/ticker-posts

11 वी सीईटी परीक्षा 21 ऑगस्टला होणार; कसे असेल स्वरुप..वाचा..

 * 11 वी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक आज जाहीर झाले.

 * 21 ऑगस्टला अकरावी सीईटी परीक्षा राज्यभरात घेतली जाणार आहे.






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 मुंबई : दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला, आता 11 वी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक आज जाहीर झाले. 21  ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 च्या दरम्यान अकरावी सीईटी परीक्षा राज्यभरात घेतली जाणार आहे. 20 जुलै सकाळी 11:30 पासून  ते 26 जुलै पर्यंत परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले आवेदन पत्र ऑनलाईन भरायचे आहे. 10  वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सीईटी परिक्षेची आता वाट पाहत होते. 

 अशी असेल सीईटी

*राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना शुल्क भरावे लागणार नाही.

*इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणीसाठी 178 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.  

*अर्ज नोंदणी करताना विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र निवडता येणार आहे.

* राज्य शिक्षण मंडळामार्फत ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे.

 *सीईटी परीक्षा ऐच्छिक असणार असून 100 गुणांची

*गणित, विज्ञान, समाजशास्त्र , इंग्रजी हे ४ विषय

* प्रत्येक विषयांचे प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहे.

* परीक्षा बहुपर्यायी उत्तरांची असणार असून ओएमआर पद्धतीने घेतली जाणार आहे. 

नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला. अंतर्गत मूल्यपामनद्वारे लागलेल्या निकालात अनेक विद्यार्थ्यांना 90 टक्के, 100 टक्के गुण मिळाले. मात्र, इतके गुण मिळून सुद्धा विद्यार्थ्यांना नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी यावर्षी पहिल्यांदाच अकरावी सीईटी प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे दहावीमध्ये चांगले गुण मिळाले म्हणून हुरळून न जाता सीईटी परीक्षेत सुद्धा चांगले गुण मिळवण्यासाठीची तयारी करावी लागणार आहे.  यावर्षी पहिल्यांदाच दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यपामनद्वारे लागलाय. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना 90 टक्के टक्केच्या वरती गुण मिळालेत. मात्र, हे गुण मिळून सुद्धा विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीचे नामांकित कॉलेज मिळणार नाहीये. कारण तुम्हला यंदाच्या वर्षी नामांकित कॉलेज मध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर अकरावी सीईटी परीक्षेत सुद्धा तुम्हाला चांगले गुण मिळवावे लागणार आहेत. कारण त्या गुणांच्या आधारेच मेरिट लिस्ट नुसार नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या