*WhatsApp वरील मेसेज समोरच्या व्यक्तीने वाचला की नाही ते ओळखा
*ब्लु टिक
बंद असेल तरी अडचण येणार नाही
*काही
सोप्प्या टिप्स येतील कामी
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
जेव्हा हे वैशिष्ट्य बंद केले जाते, तेव्हा निळ्या रंगाचे रंगीत मेसेज
मेसेजमध्ये दिसत नाही, जेणेकरून त्या व्यक्तीने आपला मेसेज
पाहिला आहे की नाही याचा अंदाज येत नाही. परंतु, आम्ही आज
आपल्याला काही टिप्सच्या माध्यमातून निळा टिक बंद केल्यावरही मेसेज पाहिला आहे की
नाही हे कसे माहित करायचे ते सांगत आहो. पाहा टिप्स
मेसेज वाचला आहे की नाही असे करा माहित
१. सर्व प्रथम WhatsApp उघडा आणि ज्या व्यक्तीसोबत
बोलायचे आहे त्याला मेसेज पाठवा.
२. मेसेज पाठविल्यानंतर थोडा वेळ थांबा.
त्या व्यक्तीने ब्लु टिक बंद केले आहे की नाही याची खात्री करा.
३. हे देखील आवश्यक आहे की संदेशावर दोन
राखाडी टिक्स असतील तर या दोन टिकचा अर्थ असा होतो की समोरच्या व्यक्तीचे इंटरनेट
सुरु आहे आणि मेसेज देखील प्राप्त झाला आहे.
४. बऱ्याच काळानंतरही, जर तुमच्या मेसेजेला निळा टिक मिळाला
नाही, तर आता तुम्हाला ही ट्रिक वापरावी लागेल.
५. यासाठी तुम्हाला एक व्हॉईस मेसेज
पाठवायचा आहे , ज्याद्वारे
ती व्यक्ती आपल्याकडे दुर्लक्ष करीत आहे की नाही हे समजेल.
६. व्हॉईस संदेशामध्ये काही बोलण्याची आवश्यकता नाही. हा व्हॉईस मेसेज पाठविल्यावर, तुम्हाला त्यावर राखाडी रंगाचे माइक चिन्ह बनविलेले दिसेल. समोरच्या व्यक्तीने मेसेज ऐकल्याशिवाय हे चिन्ह तिथेच राहतील.
७. प्राप्तकर्त्याने तो व्हॉईस संदेश
ऐकताच, राखाडी माइकचा रंग
निळ्यामध्ये बदलला जाईल.
८. या ट्रिकच्या मदतीने समोरचा व्यक्ती
तुम्हाला रिप्लाय देत आहे की दुर्लक्ष करत आहे हे सहज माहिती पडेल.
0 टिप्पण्या