लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
·
फोनमध्ये 6000mAh बॅटरी
आणि 64MP कॅमेरा
नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची टेक्नोलॉजी कंपनी सॅमसंग भारतीय
बाजारात आपला आणखी एक नवीन स्मार्टफोन Galaxy
M32 आज लाँच करणार आहे. या फोनला आज २१ जून रोजी दुपारी १२
वाजता एका ऑनलाइन इव्हेंट मध्ये लाँच केले जाणार आहे. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा
कॅमेरा आणि 6000mAh ची बॅटरी यासारखे जबरदस्त फीचर्स मिळणार
आहेत. या फोनची टक्कर Poco M3 Pro, Realme 8 आणि Redmi
Note 10 यासारख्या फोनसोबत होईल.
सॅमसंग गॅलेक्सी एम ३२ एक मिड रेंज स्मार्टफोन असणार
आहे. याची किंमत १५ हजार ते २० हजार रुपये दरम्यान असणार आहे. Galaxy M32 ची विक्री ऑनलाइन शॉपिंग
वेबसाइट Amazon India द्वारे केली जाणार आहे. अॅमेझॉनवर यासंबंधित एक पेज लाइव्ह झाले आहे. या
फोनला तीन कलर ऑप्शन ब्लॅक, व्हाइट आणि ब्लू या रंगात उपलब्ध
करण्यात येणार आहे. या फोनची फीचर्स लाँचआधीच लीक झाली आहेत.
Galaxy M32 ची फीचर्स
सॅमसंग गॅलेक्सी
एम ३२ स्मार्टफोनमध्ये फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटचा AMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे. स्क्रीनचा साइज ६.४ इंच असू शकतो. याच्या
प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिला ग्लास ५ दिला आहे. या फोनमध्ये ६ जीबी रॅम सोबत
१२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज दिला आहे. फोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर दिला आहे.
फोटोग्राफीसाठी यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर
सोबत क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याशिवाय, एक 8MP चे सेंसर आणइ दोन 5MP चे सेन्सर दिले आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये फ्रंटला २० मेगापिक्सलचा
कॅमेला दिला जाणार आहे. जो वॉटरड्रॉप नॉच सोबत येईल. फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी दिली जाणार आहे. सोबत 15W चा चार्जर मिळू
शकत
0 टिप्पण्या