नगरनाका चौकातील धक्कादायक घटना, मारहाण करणारा
एनएसजी कमांडो
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
औरंगाबाद : येथील नगर नाका चौकात नाकाबंदी सुरू असताना एका वाहनाला
थांबविल्यानंतर सदर वाहनामधील युवकाने छावणी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक पांडुरंग
भागिले यांना गणेश गोपीनाथ भुमे नाव (३४, रा. दिल्ली, ह. मु.
फुलंब्री) याने मारहाण करून जखमी केले. तसेच नाकाबंदीत असलेल्या अन्य पोलिसांनाही
मारहाण केली. मारहाण करणारा हा तरुण NSG कमांडो असल्याचे स्पष्ट झाले असून या घटनेने खळबळ उडाली आहे.
पोलीस निरिक्षक मनोज पागरे यांनी दिलेल्या
माहितीनुसार, बुधवारी नगरनाका येथे छावणी पोलीस ठाण्याचे
कर्मचारी अधिकारी नाकाबंदीच्या कर्तव्यावर तैनात होते. यावेळी छावणी पोलीस
ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक पांडुरंग भागिले, जमादार टाक व
इतर कर्मचारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नगरनाका चौकात उपस्थित होते.
या ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवरही कारवाई सुरू होती. एका चारचाकी वाहनातून गणेश
भुमे हा विनामास्क जात असल्याचे निदर्शनास आल्यावर पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी
केली.
तेव्हा या तरुणाने नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यास
सुरुवात केली. या झटापटीत सहायक निरीक्षक भागिले यांच्या नाकाला आणि तोंडाला मार
लागला असून, जमादार टाक यांच्या अंगावरील कपडे फाडले गेले
आहेत. दिल्ली येथे एनएसजी सेंट्रल आर्म पोलीस फोर्स येथे कार्यरत असल्याचे समजते.
ज्या गाडीतून हा जवान प्रवास करित होता. त्या गाडीवरही एनएसजी कमांडो असे लिहिलेले
आहे.
या घटनेची
माहिती मिळताच, पोलीस उपायुक्त मीना मकवाना,
निकेश खाटमोडे, छावणी विभागाचे सहाय्यक पोलीस
आयुक्त विवेक सराफ, छावणीचे पोलीस निरीक्षक मनोज पगारे यांनी
घटनास्थळी धाव घेतली. या मारहाण प्रकरणात गणेश भुमे याला ताब्यात घेण्यात आले असून
त्याच्या विरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलीस
दलात अस्वस्था पसरली आहे.
0 टिप्पण्या