Ticker

6/Breaking/ticker-posts

Google चा मदतीचा हात, भारतात उभारणार ८० ऑक्सिजन प्लांट, ११३ कोटींची घोषणा..!

 


*गुगल भारतात उभारणार ८० ऑक्सिजन प्लांट

.* गुगल ११३ कोटी रुपयांचा निधी देणार

 

लोकनेता न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

नवी दिल्ली : दिग्गज टेक कंपनी गुगलने माहिती दिली आहे की, Google.org ही शाखा इतर संघटनांसोबत मिळून देशात ८०  ऑक्सिजन प्लांट खरेदी करणार व उभारणार आहे. तसेच, ग्रामीण क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासासाठी ११३ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे म्हटले आहे.




Google.org
८०  ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीसाठी गिवइंडियाला जवळपास ९० कोटी आणि पाथ या संस्थेला १८.५ कोटी रुपये देणार आहे. यासोबतच, ग्रामीण आरोग्य प्रणालीला मजबूत करण्यासाठी अपोलो मेडस्किल्सद्वारे कोविड-१९ मॅनेजमेंटसाठी २० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल.

Google.org  
भारतातील १५ राज्यामधील १, ८०,००० आशा कार्यकर्ता आणि एएनएमच्या कौशल्य विकासासाठी ३.६ कोटी रुपये अनुदान अरमानला देईल. अरमान या अनुदानाचा वापर आशा कार्यकर्ता आणि एएनएमला अतिरिक्त मदत आणि सल्ला देण्यासाठी कॉल सेंटरची स्थापना करेल. गुगल इंडियाचे कंट्री हेड आणि उपाध्यक्ष संजय गुप्ता म्हणाले की, आम्ही या गोष्टीकडे लक्ष दिले आहे की लोकांकडे सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक माहिती आणि साधनं असतील.




दरम्यान, यूनिसेफने देखील याआधी भारतात ९ ऑक्सिजन प्लांट उभारण्याची घोषणा केली आहे. यूनिसेफने भारताला ४५०० पेक्षा अधिक ऑक्सिजन कन्संट्रेटर आणि २०० आरटीपीसीआर तपास मशीन्स उपलब्ध केली आहेत. हे ९ प्लांट गुरजात, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुराच्या हॉस्पिटलमध्ये उभारले जातील.

यूनिसेफने सांगितले की, ४६५० ऑक्सिजन कन्संट्रेटर अरुणाचल प्रदेश, मणिपूर, सिक्किम, राजस्थान, गुजरात, पश्चिम बंगाल आणि अन्य राज्यांसाठी खरेदी करण्यात आले. याआधी ३ हजार ऑक्सिजन कन्संट्रेटर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वापरासाठी खरेदी करण्यात आले होते. सोबतच, १० राज्यात ५१२ हाय-फ्लो नेजल कॅन्यूल पाठवण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या