लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
साऊदम्पटन
:
फायनलचा चौथा दिवस पावसाने गाजवला आणि एकही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. पण
सामन्याच्या पाचव्या दिवशी पाऊस पडणार की खेळ होणार, याबाबतचे महत्वाचे अपडेट आता
समोर आले आहेत.
पाचव्या दिवसाचे काय
आहेत अपडेट्स, पाहा...
हवामान
खात्याने सांगितल्याप्रमाणे पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला नाही. पण सामन्याच्या
दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी चांगला खेळ झाला. आता सामन्याच्या चौथ्या दिवसाबाबत
हवामान खात्याने काय सांगितले आहे, ते पाहुया. हवामान खात्याने
चौथ्या दिवसाबाबत सांगितले होते की, " सामन्याच्या
चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला पाऊस पडेल. त्यामुळे कदाचित या दिवसाचे पहिले सत्र
होऊ शकणार नाही. त्याचबरोबर दिवसभर पावसाचे चिन्ह असेल. सामन्याच्या पाचव्या दिवशी
मात्र पाऊस पडणार नाही, पण वातावरण ढगाळ असेल."
त्यामुळे सामन्याच्या पाचव्या दिवशी चांगला खेळ होऊ शकतो, असे
आता समोर आले आहे. फक्त आता पाचव्या दिवशी ढगाळ वातावरणामुळे खेळ अपुऱ्या
प्रकाशामुळे थांबवला जातो का, हे पाहणे सर्वात महत्वाचे
असेल. कारण सामन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अपुऱ्या प्रकाशामुळे काहीवेळा
खेळ थांबवण्यात आला होता. त्यामुळे आता पाचव्या दिवशी असे घडू नये, अशीच आशा चाहते व्यक्त करत असतील.
सामन्याचा
पाचवा दिवस हा दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा असेल. कारण पाचव्या दिवशी खेळ सुरु
झाल्यावर न्यूझीलंडच्या संघाला भारतीय गोलंदाज किती षटकांमध्ये बाद करतात, हे पाहणे सर्वात महत्वाचे ठरणार
आहे. कारण न्यूझीलंडच्या अजून आठ विकेट्स बाकी आहेत आणि ते ११६ धावांनी अजूनही
पिछाडीवर आहेत. त्यामुळे सामन्याचा पाचवा दिवस हा सर्वात महत्वाचा असेल. या दिवशी
भारताचे वेगवान गोलंदाज कशी सुरुवात करतात, हे पाहणे
महत्वाचे असेल. कारण भारताला जर लवकर विकेट्स मिळाल्या तर ते सामन्यात झोकात
पुनरागमन करू शकतात, त्यामुळे आता सामन्याचा पाचाव दिवस
महत्वाचा ठरणार आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचे फलंदाज किती धावा करतात, याकडेही सर्वांचे लक्ष असेल.
0 टिप्पण्या