Ticker

6/Breaking/ticker-posts

Father's Day 2021: वडिलांना वेळ देऊन त्यांच्याशी साधा संवाद..द्या ' हटके ' शुभेच्छा

 



लोकनेता न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

नवी दिल्ली: आईप्रमाणे वडील सुद्धा आपल्या मुलांसाठी भरपूर कष्ट करतात. अतिशय शांत पद्धतीने ते आपले जबाबदारी पार पाडतात. मुलांचे हट्ट पुरवण्यापासून ते मुलांचे स्वप्न पूर्ण होईपर्यंत, प्रत्येकाचा बाबा सगळ्याच गोष्टींचा ताण एकट्यानं सहन करतो. यामुळेच प्रत्येक मुलांच्या आयुष्यात बाबाच त्यांचा हिरो असतो. सुख असो वा दुःख आई-वडील आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतातच.

 

 

पण मूल मोठं झाल्यानंतर काम आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्यामुळे आई-वडिलांपासून कळत-नकळत दुरावले जातं. या सुंदर नात्यातील अंतर वाढू लागतं. विशेषतः बाबांसोबत असलेल्या नात्यामध्ये अंतर जास्त वाढल्याचं पाहायला मिळतं. पण छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचे आपल्या वडिलांसोबतचे नाते पुन्हा मजबूत होऊ शकते. फादर्स डेच्या निमित्ताने जाणून घेऊया काही महत्त्वपूर्ण टिप्स

 

वडिलांना वेळ देऊन त्यांच्याशी संवाद साधा

बहुतांश घरांमध्ये मुले आपल्या आईसोबत मनमोकळेपणा गप्पा मारतात, तिच्याशी संवाद साधतात. पण वडिलांशी एखादी गोष्ट मुक्तपणे बोलायची असेल मुलांना थोडीशी भीती वाटते. वडिलांसोबत मोकळेपणाने संवाद घडत नाही. कोणतेही दडपण न बाळगता वडिलांनाही तुमचा वेळ द्या. एकमेकांसोबत गोष्टी शेअर करण्यास सुरुवात करा. वडिलांसोबत कुठेतरी बाहेर फिरायला जा. मित्रमैत्रिणींऐवजी बाबांसोबत मॉर्निंग वॉक अथवा संध्याकाळी एखादा फेरफटका मारावा. या गोष्टी नियमित केल्यास तुमचे व बाबांचे नातं नक्कीच दृढ होईल.

 

 त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ सरप्राइज द्या

एखाद्याला खूश करायचं असेल तर त्यांचा मार्ग पोटातून जातो, असे म्हणतात. बाबा कामावरून घरी येताना तुमच्या आवडीचे खाद्यपदार्थ आणत असत, लहानपणाची ही आठवण प्रत्येकाचीच असेल. स्वतःची हौसमौज कमी करून बाबांनी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. आता बाबांचे खाण्यापिण्याचे लाड पुरवण्याची जबाबदारी तुमची आहे. त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ तुम्ही स्वतः घरामध्ये तयार करून त्यांना सरप्राइज द्या. अथवा त्यांच्या आवडत्या हॉटेलमधून स्वादिष्ट पदार्थ ऑर्डर करा. ते नक्कीच खूप खूश होतील.

 

 आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या

आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घेणे ही मुलांची जबाबदारी आहे. बाबांना एखाद्या छोट्या किंवा गंभीर आजाराची समस्या असेल तर त्यांच्या औषधोपचाराची योग्य काळजी घ्यावी. त्यांना योगासने, छोटेमोठे व्यायाम प्रकार शिकवा. वडिलांना वेळोवेळी औषधे देणे, त्यांची मदत करणं. डॉक्टरांकडे नेऊन त्यांच्या आरोग्याची माहिती जाणून घेणे इत्यादी गोष्टीही कटाक्षाने कराव्यात. यामुळे वडिलांनाही समजेल की तुम्ही त्यांची मनापासून काळजी करत आहात. काही मुलांना विचार करून बोलण्याची सवय नसते. यामुळे कळत नकळत तुम्ही आपल्या वडिलांचं मन दुखावत आहात, हे लक्षात घ्या. तुमच्या कटु शब्दांमुळे वडिलांना गंभीर मानसिक त्रास होण्याची शक्यता असते. हे नुकसान टाळण्यासाठी वडिलांसोबत मोकळेपणाने आणि प्रेमाने संवाद साधा. त्यांना तुमचे म्हणणे शांतपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करा.

 


वडिलांना द्या WhatsApp स्टिकर्सच्या माध्यमातून 'हटके' शुभेच्छा, असे करा डाउनलोड

 Whats App वरील स्टिकर्स प्रचंड लोकप्रिय आहे . या स्टिकर्समुळेच आपण एकमेकांशी अधिक चांगले बोलू शकतो. अर्थातच, शब्दात बोलता येत नाही. त्या भावना स्टिकर्स सहज समोरच्या व्यक्ती पर्यंत पोहचवतात. उद्या फादर्स डे आहे आणि हा दिवस साजरा करण्यासाठी इन्स्टंट मेसेजिंग अॅपने "पापा मेरे पापा" नावाचे निराळे स्टिकर पॅक दखल केले आहे .हे एक प्रादेशिक पॅक असून ते लवकरच बर्‍याच देशांमध्ये सादर केले जाईल. जाणून घ्या डिटेल्स.



व्हॉट्सअ‍ॅपचे अपडेट देणार्‍या डब्ल्यूएबीएटाइन्फोने ही माहिती दिली आहे. की, हे स्टिकर पॅक सर्वप्रथम भारत आणि इंडोनेशियामध्ये सादर करण्यात आले होते. अशात हे स्टिकर्स प्रत्येक वापरकर्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी थोडा वेळ लागू शकेल. असेही सांगितले जात आहे की, ज्या देशांत वडिलांना पापा असे संबोधले जाते अशा व्हॉट्सअ‍ॅपवर हे स्टिकर पॅक देण्यात येणार आहे. परंतु, ते एक किंवा दोन देशांपुरते मर्यादित राहणार नसून जागतिक स्तरावर देखील उपलब्ध केले जाईल.

 

व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर पॅक डाउनलोड कसे करावे

*यासाठी प्रथम तुम्हाला व्हॉट्सअॅपवर जावे लागेल. त्यानंतर कोणत्याही एका चॅटवर जा.

*त्यानंतर चॅट बारमधील स्टिकर चिन्हावर टॅप करा.

*हे स्टिकर गॅलरी उघडेल. येथे आपल्याला अनेक स्टिकर पॅक दिसतील. येथे आपल्याला पापा मेरे पापा पॅक देखील दिसेल.

*डाउनलोड न केलेल्या पॅकवर पुढील चिन्हे असतील. यावर टॅप करा.

*यानंतर ते आपल्या चॅट विंडोमध्ये जोडले जाईल. यानंतर आपण आपल्या वडिलांच्या चॅट विंडोवर जाऊन नवीन मार्गाने शुभेच्छा देऊ शकता.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या