Ticker

6/Breaking/ticker-posts

मराठी कलाकारांना बॉलिवूडमध्ये मिळते दुय्यम वागणूक; अशोक सराफ यांची खंत

 


लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 मुंबई- अनेक मराठी कलाकारांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं नशीब आजमावलं. त्यातील काही यशस्वी झाले तर काहींना छोट्या-मोठ्या भूमिकांवर समाधान मानावं लागलं. आपल्या विनोदी अभिनय शैलीने मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ यांनीही अनेक हिंदी चित्रपटात अभिनय केला. अशोक यांच्याप्रमाणे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनीही हिट बॉलिवूड चित्रपटात काम केलं. परंतु, मराठी चित्रपटसृष्टीत सर्वोत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या या अभिनेत्यांना हिंदी चित्रपटांमध्ये मात्र कायम दुय्यम भूमिका मिळाल्या. कधी मदतनीसांच्या तर कधी दिवाणजींच्या. खुद्द अशोक सराफ यांनी या मागील कारणाचा खुलासा केला होता.

 

एका वृत्तवाहिच्या मुलाखतीत अशोक यांनी त्यांचे विचार मांडत म्हटलं, 'मराठी ही अत्यंत प्रयोगशील मनोरंजनसृष्टी आहे. नाटक असो, मालिका असो की चित्रपट मराठीत पटकथांना फार महत्व दिलं जातं. इथे कथाच खरी हिरो असते. अन् त्या कथेच्या अनुशंगानं कलाकारांना काम मिळतं. परंतु बॉलिवूडमध्ये तसं नाही. तिथे हिरोंना अधिक महत्व दिलं. रोल साध्या माणसाचा असला तरी देखील हिरो रुबाबदार, सुंदर असा दिसतो. अर्थात ग्लॅमर हाच बॉलिवूडचा क्रेंद्रबिंदू आहे. त्यामुळं मराठीतील अनेक कलाकार त्यांच्या या व्याख्येत बसत नाहीत. कारण मराठी प्रेक्षक रंगरुप पाहून नाही तर कलाकाराचा अभिनय पाहून त्याच्यावर प्रेम करतात. त्यामुळं मराठीतील अनेक लोकप्रिय कलाकार हे सर्वसामान्यच दिसतात. अन् त्यांचं ते सामान्यत्व बॉलिवूडला नको आहे. त्यामुळं मराठी कलाकारांना नेहमीच नोकर किंवा तत्सम दुय्यम भूमिका दिल्या जातात.'

 

काही कलाकारांचा अपवाद म्हणून त्यांनी नाना पाटेकर, स्मिता पाटील आणि अमोल पालेकर यांची नावं घेतली. परंतु, अशोक यांनी सांगितलेलं हे कारण ऐकून अनेक प्रेक्षकांनी तोंडात बोटं घातली होती. बॉलिवूडच्या चकचकत्या दुनियेमागील सत्य अशोक यांनी प्रेक्षकांना सांगितलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या