लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
न्यायालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या जातप्रमाणपत्र
पडताळणी समितीला कायदेशीरदृष्ट्या पूर्ण मान्यता व अधिकार आहेत, अश्या न्यायिक समितीने आपल्या सर्व
कागदपत्रांची सखोल चौकशी केली. या चौकशीच्या आधारावर आढळलेल्या तथ्यांच्या आधारे
सदर जातपडताळणी समितीने माझे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा या आधी तीन वेळा
निर्वाळा दिला आहे.
यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च
न्यायालयात दाद मागण्यासाठी खासदार नवनीत राना यांचे वकील जेष्ठ विधिज्ञ ऍड
ढाकेपालकर आणि ऍड गाडे यांनी आज याचिका दाखल केली आहे. निर्णयाविरोधात
जिल्ह्याच्या विकासाला बाधा आणण्याचे आणि माझे खच्चीकरण करण्याचे काम केले असून हे
एक राजकीय षडयंत्र आहे. मी संघर्ष करणारी महिला आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा
निकाल हा अंतिम असेल आणि तेथे सत्याचाच विजय होईल असा विश्वास खासदार नवनीत राणा
यांनी व्यक्त केला आहे.
0 टिप्पण्या