लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
पाथर्डी: कोरोनाचं अन् बिबट्याचं अतूट .. अनोखं असं नातं गेल्या वर्षा पासून बनलय .. हे दोन क्रूर मानवाचे शत्रू एका पाठोपाठ हल्ले . ददशत निर्माण करीत आहेत . तथापि एक - एक अशा क्रमाने यांचा दरारा सुरु असतो , आधि करोना दहशत त्यातून थोडेफार सावरायला लागलो की लगेच बिबट्या अवतरतो याचा प्रत्यय आता सलग दुसऱ्या वर्षो येऊ लागला आहे .
सध्या करोना थंडावला असून सुटकेचा श्वास घेऊ लागले असतांना आता बिबट्याचे संकट पुन्हा एकदा उभे ठाकले आहे त्यामुळे या दोन क्रूर शत्रूंमुळे एक अदृष्य तर दुसरा दृष्य मानवाला जगणे हराम झाले आहे .
याबाबत हकीगत अशी की, तालुक्यातील जवखेड खालसा येथे सुमारे आठ महीन्यानंतर सरगड वस्तीवर बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले आहे.गुरुवारी राञी दादासाहेब सरगड यांच्या वस्तीवर बिबट्याने शेळीची शिकार केली.
वन कर्मचारी कानिफ वांढेकर यांनी त्या परीसरात पाहणी करुन ठसे घेतले.
शेळीच्या जखमांची नोंद घेत पशुवैद्यकीय अधिकारी डाॕ. राजेंद्र कांडेकर व वन अधिकारी दादासाहेब वाघुलकर यांनी यावेळी पंचनामा केला.
जवखेडे गावाला सद्धा शेतीसाठी राञीची वीज उपलब्ध आहे.त्यामुळे शेतामध्ये ऊसाला पाणी देण्यास गेलेल्या सरगड यांना बुधवारी राञीही बिबट्याचे दर्शन झाले होते.परीसरात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
0 टिप्पण्या