.
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
तालुक्यातील कूकाने येथे जेउर-देडगाव रस्त्यालगत राहत असलेले
शामसुंदर धोंडीराम खेसे यांच्या घरातून शनिवार रोजी रात्री १ वाजेच्या
सुमारास साडेबावीस तोळे सोने व 65 हजार रोख रक्कम अशी साडेबावीस
लाख रुपये किमतीचा मुदेमाल चोरट्यांनी पोबारा केली असल्यामुळे
तालुक्यासाह परिसरात खळबळ उडाली आहे. नेवासे तालुक्यात दिवसांदिवस
गुन्हेगारांचे फगत चालले असून पोलिस प्रशासनाचा धाक संपला असल्याचेच
चित्र निर्माण झाले आहे. याबाबत पोलिस कर्मचार्याकडून मिळालेली माहिती
अशी की कुकाने येथील पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर जेउर-देडगाव
रस्त्यालगत राहत असलेले शामकुमार धोंडीराम खेसे यांच्या मुलाचे लग्न २०
जून रोजी असल्याने घरात पाहुणेमंडळी आले होते तर नवरी मुलीसाठी
सोंनाराकडून दुपारीच साडेबावीस तोळे सोने व 65 हजार रोख रक्कम घरात
खरेदी करून आणून ठेवले होते. रात्री १ वाजेच्या सुमारास चोरटे आले
असल्याचे सिसिट्व्हि मध्ये कैद झाले आहेत. खेसे यांच्या शेजारी ललित
भंडारी राहत असून चोरट्यांनी अगोदर भंडारी यांच्या घराचा कटवणीच्या
साह्याने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला मात्र दरवाजा तुटलाच नाही घरच्या
चारही बाजूने शोधाशोध केली मात्र त्यांना घरात प्रवेश करता आलाच नाही
नंतर त्यांनी आसपासच्या सर्व घरांच्या प्रवेश गेट ला झटपट करत शेवटी
आपला मोर्चा शामसुंदर खेसे यांच्या घरात प्रवेश केला घरात जवळपास 18
-20 लोक झोपलेली होती घरातील हॉल मध्ये 5-6 महिला झोपलेले
होत्या त्यांना ओलांडून बेडरूम मध्ये देखील 5-6 पाहून्या झोपेल होत्या
मात्र अंदाजे स्प्रे च्या साह्याने बेडरूम मधील दिवाण खालून 3-4 बॅग व
कपटातील सोने व रोख 65 हजार रक्कम तसेच घरच्या वरील मजल्यातील
खोलीतून देखील काही बॅग घेऊन तीन चोरटे बाहेरच्या दरवाजा मधून बाहेर
येऊन बॅग ची उचकापाचक केली. पहाटेच्या वेळी घरातील मुलगी उठल्यावर
हा प्रकार लक्षात आल्यावर सर्वांना उठवत शेजरीपाजारी उठवले शेजारी राहत
असलेले पत्रकार बाळासाहेब सरोदे यांनी पोलिस निरीक्षक विजय करे यांना
फोन करून 4 वाजेच्या दरम्यान माहिती दिली. सकाळी 5 वाजेच्या दरम्यान
पोलिस निरीक्षक विजय करे पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे डोकस्क्वाड व
फिंगर प्रिंट चे पथक याठिकाणी बोलवण्यात आले होते. परिसराचे लक्ष आता
पोलिस अधिकार्यांच्या पुढील तपासकडे लागल्या आहेत. उशिरा पर्यंत फिर्याद
दाखल करण्याचे काम चालू होते
चौकट. आयुष्यात कमवलेल रात्रीतून गायब झाल... मुलाच्या
लग्नाच्या निमित्ताने घरात मुलीसह पाहुणे मंडळी जमा झाली होती नवीन
सुनेसाठी दुपारीच सोनारच्या दुकानातून सोने खरेदी करून आणले होते. मात्र
रात्रीतुण कष्टाने कमवलेल गायब झाले असल्याची प्रतिक्रिया शामसुंदर खेसे
यांनी बोलताना दिली.
हातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी
हातगाव दि १९ प्रतिनिधी शेवगाव तालुक्यातील हातगाव येथे शनिवारी पहाटे अज्ञात दरोडेखोरांनी झंज यांच्या घरात प्रवेश करून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात दिलीप रामराव झंज वय 65 प्रकाश दिलीप झंज वय 31 दोघे पितापुत्र जबर जखमी झाले,त्यांना पुढी उपचारासाठी नगर ला खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे
तर सोनेचांदीच्या मौल्यवान दागिन्यासह मोठा ऐवज लंपास झाला झाल्याच्या घटनेमुळे मोठी घबराट निर्माण झाली आहे
याबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती हातगाव येथील झंज कुटुंब गावात भर वस्तीत राहत असून शनिवारी पहाटे दोन ते तीनच्या सुमारास राहत्या घराचा दरवाज्या तोडून घरात प्रवेश दरोडेखोरांनी सामानाची उचकपचक करून मौल्यवान वस्तू रोख रक्कम लंपास केल्या जात असताना
दिलीप झंज, प्रकाश झंज यांनी दरोडेखोरांशी प्रतिकार केला असता दरोडेखोरांनी पितापुत्रावर सशस्त्र हल्ला केल्याने दोघे रक्तबंबाळ झाले डोक्यात धारदार हत्याराने वार केले आहे आरडा ओरड करताच दरोडेखोरांनी पोबारा केला दोघांचा प्रयत्न तोकडा पडला गेला ग्रामस्थांनी जखमींना पुढील उपचारासाठी शेवगावला हलविण्यात आले मात्र डोक्याला जबर मार असल्याने गंभीतर परिस्थिती झाल्याने अहमदनगर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले
ग्रामस्थांनी घटनेची माहिती बोधेगाव पोलिसांना दिली मात्र कोणीच घटना आले नाही सकाळी उपनिरीक्षक पावरा,शेवगावचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे, यांनी भेट दिली
झंज यांच्या घरात जखमीचे रक्तरक्तश्राव झाल्याने पसरल्याचे दिसून आले आहे या घटनेत रोख रक्कम,सोनेचांदीच्या वस्तू गायब झाल्या आहेत मात्र तपशील समजू शकले नाहीं या बरोबरच सत्यनारायण साखरे, बबन गोसावी, मगर, अभंग, गहिनीनाथ अभंग, यांच्या घरी दरोडेखोरांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी झाला आहे पोलीस गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती
0 टिप्पण्या