शर्मिला गोसावी,गुंफा कोकाटे,स्वाती राजेभोसले,रिता जाधव,सरोज आल्हाट यंदाच्या मानकरी
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर :“धुळे येथील कै.सौ.नलिनी सुर्यवंशी यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त सामाजिक,साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शर्मिला गोसावी, (अहमदनगर),डॉ.गुंफाकोकाटे, (श्रीरामपूर ),स्वाती राजेभोसले, (पुणे), रिताताई जाधव,(मुंबई),सरोजआल्हाट, (नाशिक ',वृंदा कुलकर्णी, (कोल्हापूर) सविता दरेकर, (नाशिक) ,सुनीता बहिरट, (आळे ),ज्योत्स्ना डासाळकर, (कोल्हापूर ) यांना अभिनव खान्देश प्रेरणादायी महिला पुरस्कार २०२१ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे,” अशी माहिती अभिनव खान्देश परिवाराचे प्रमुख श्री.प्रभाकर सुर्यवंशी यांनी दिली.
अहमदनगर मधील प्रा.शर्मिला गोसावी या श्री.साई इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असून त्या शब्दगंध साहित्यिक परिषद, च्या संस्थापक सदस्य आहेत.त्यांची बांगड्यांची खैरात, नजराणा,मनमीत पुस्तके प्रकाशित असून वन्स मोअर मराठी कविता व मनातला पाऊस चे त्यांनी संपादन केलेले आहे.चौदा राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे सूत्रसंचालन केलेले असून आकाशवाणी अहमदनगर,पुणे वर ११ वेळा कविता वाचन केले आहे.उत्कृष्ट निवेदिका म्हणून २८९ कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केलेले असून त्या शब्दगंध प्रकाशन,च्या संचालिका आहेत.
श्रीरामपूर येथील डॉ.गुंफा कोकाटे या कला व वाणिज्य महाविद्यालय बेलापूर येथे प्रभारी प्राचार्यां असुन शब्दगंध व मसाप श्रीरामपूर च्या उपाध्यक्षा आहेत.त्यांना नामांकित चौदा पुरस्कार मिळालेले आहेत.रानभरारी,मी सूर्याच्या कुळाची,वादळांना झेलताना,ओवीगीतांचे स्वरुप,फुले यांच्या कवितेची समीक्षा,वांझोटे वार पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
पुणे येथील स्वाती राजेंभोसले-गायकवाड यांचे काही झंकार,काही हुंकार काव्यसंग्रह प्रसिद्ध असून राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनासह अनेक साहित्य संमेलनामध्ये त्या सहभागी असतात.त्यांनी आकाशवाणी अहमदनगर वर कविता वाचन केलेले असून रत्नागिरी येथे झालेल्या महिलांच्या साहित्य संमेलनामध्ये त्यांचा विशेष सन्मान करण्यात आलेला आहे.
नाशिक येथील सरोज आल्हाट या समाजशाश्र पदवीधर,जे.सी.पी.आर. असून शब्दगंध च्या नाशिक जिल्हा प्रतिनिधी आहेत.विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय असून त्यांची अश्रूंच्या पाऊल खुणा,कविता तुझ्या नी माझ्या,सखे अशी पुस्तकं प्रकाशित आहेत.पुणे रेडीओ सिटीवर त्यांची मुलाखत प्रसारित झालेली असून त्यांना बाबा पदमजी उत्कृष्ट साहित्य पुरस्कार 2020 जाहिर झालेला आहे.
मुंबई पोलीस दलामध्ये ३० वर्षापासून कार्यरत असलेल्या सौ.रिताताई जाधव यांचे मुंबई,बीड,पुणे,नगर आकाशवाणीवर काव्य वाचन झालेले असून त्यांचा नात्यांच्या पलीकडे हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे.कोरोना काळात त्यांनी अनेकांना मदत केलेली असून काही महिलांचे स्वत: अंत्यविधी केलेले आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल अनेक संस्थानी घेतलेली असून त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.
आळे ता.जुन्नर येथील सुनिता बहिरट या गृहिणी असून अनेक काव्य संमेलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत.भोंडल्याची गणी त्यांची स्पेशालिटी असून शाळेतील मुलीना त्या गाणे शिकवतात.
सविता दरेकर या नाशिक येथील असून त्यांनी विविध दिवाळी अंकातून लेखन केलेलं आहे.माझ्या शब्दांच्या गर्भात हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध असून काव्य सादरीकरणासाठी त्यांना पारितोषिके मिळालेली आहेत.
कोल्हापूर येथील जेष्ठ शिक्षिका वृंदा कुलकर्णी या बालसाहित्यिका असून त्यांनी ११ बालनाट्य लिहिलेली आहेत.
ज्योत्स्ना डासालकर या महाविद्यालया त असल्या पासून आध्यात्मिक व काव्यलेखन करतात,निसर्ग व मानवी जीवना वर त्यांचे विशेष लेखन आहे.
या सर्वांच्या कार्याची दखल घेऊन पुरस्कार निवड समितीने निवड केलेली असून लवकरच त्यांना मान्यवरांचे हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र,रु.२००० ची पुस्तकं असे पुरस्काराचे स्वरूप राहणार आहे. पुरस्कारार्थींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या