लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
राज्यात एकीकडे कोरोनाचा संसर्ग कमी
होताना दिसत आहे तर दुसरीकडे तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या
पार्श्वभूमिवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपलं संरक्षण करा, नियमांचं पालन करा असं आवाहन केलं आहे.
निर्बंध शिथिल केले गेले असले तरी सद्यस्थितीत पर्यटनस्थळांना भेट देण्यास त्यांनी
टाळावे असे पवार यांनी म्हटलं आहे.
' लोक जिल्ह्याबाहेर गेले तर ...'
पुणे जिल्ह्यातील कोरोनाव्हायरसच्या
परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार यांनी बैठक घेतली होती. त्यानंतर ते बोलते
होते. पर्यटनाच्या उद्देशाने लोक जिल्ह्याबाहेर जात राहिले तर घरी परतल्यानंतर अशा
लोकांना 15 दिवसांची अलग
ठेवण्याची व्यवस्था लावण्याशिवाय प्रशासनाकडे दुसरा पर्याय राहणार नाही. त्यामुळे
नागरिकांनी घरीच राहावं आणि सुरक्षित राहावं असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
0 टिप्पण्या