Ticker

6/Breaking/ticker-posts

जम्मूत हवाई तळावर दहशतवादी हल्ला, सर्वत्र अलर्ट जारी

 दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला, एकाला अटक


 

लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

जम्मूः जम्मूतील हवाई दलाच्या तळावर आज रविवारी पहाटेच्या सुमारास दोन कमी तीव्रतेचे स्फोट झाले. हा दहशतवादी हल्ला असल्याचं जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगुन या प्रकरणी हवाई दल आणि इतर तपास यंत्रणाकरून तपास सुरू असल्याचंही ते म्हणाले.  जम्मूत हवाई दलाच्या तळावर झालेला हल्ला हा ड्रोनने करण्यात आल्या असून हे ड्रोन पाकिस्तानातून आल्याचं गुप्तचर संस्थांनी सांगितलं आहे. दरम्यान, या घटनेनंतर पंजाबमधील पठाणकोट इथल्या हवाई दलाच्या तळावर अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तपास एनआयकडे?

हवाई दलाच्या तळावर पहाटेच्या सुमारास दोन ड्रोन्स कोसळले. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांकडून पहिल्यांदाच हल्ल्यासाठी ड्रोन्स उपयोग केल्याचा शक्यता अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. जम्मूत हवाई दलाच्या तळाव झालेल्या स्फोट प्रकरणाचा तपास एनआयएकडे जाण्याची शक्यता आहे.

हल्ला कोणी केला आणि हल्ल्या मागे कोण होतं? याचा तपास केला जात आहे. याप्रकरणी पोलिस आणि इतर तपास संस्था या हवाई दलाच्यासोबत संयुक्तपणे काम करत आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) पथक घटनास्थळी दाखल झाले आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी दिली.

 

हवाई दलाच्या तळावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी जम्मूत देशद्रोह कायद्यांतर्गत (UAPA) गुन्हा दाखल झाला आहे. असं जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितलं. एएनआयने हे वृत्त दिलं आहे.

 

हवाई दल प्रमुख यांची घटनेवर नजर

हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदोरिया हे बांगलादेशच्या दौऱ्यावर आहेत. जम्मूतील घटनेवर ते बारकाईने नजर ठेवून आहेत. या प्रकरणी त्यांनी चौकशीसाठी आवश्यक त्या सूचना जारी केल्या आहेत. दुसरीकडे हवाई दलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर एअर मार्शल व्ही. आ. चौधरी जम्मूतील तळावर दाखल झाले आहेत. हल्ल्यात ड्रोनचा उपयोग केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पण अद्याप अधिकाऱ्यांकडून याला दुजोरा मिळालेला नाही.

दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला, एकाला अटक

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळण्यात आला आहे. या प्रकरणी लष्कर ए तोयबाच्या एका दहशतवाद्याला अट करण्यात आली असून त्याच्याकडून ५ ते ६ किलो अतिसंवेदनशील स्फोटकं (IED) जप्त करण्यात आली आहे. हे स्फोटकं तो गर्दीच्या ठिकाणी पेरणार होता, असं चौकशीत समोर आलं आहे. त्याची आणखी काही संशयितांना अटक होण्याची शक्यता आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या