लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबईः चार
महिन्यांत ओबीसींना आरक्षण देईन, नाहीतर राजकारणातून कायमचा
संन्यास घेईन, असं विधान राज्याच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फ़डणीवीस यांनी केलं होतं. त्यानंतर
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टिप्पणी केली होती. त्यावर भाजपचे नेते गोपीचंद पडळ्कार यांनी
प्रत्युत्तर दिलं आहे.
स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार
नाही, मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षण सोडवू, असेही
फडणवीस म्हणाले होते. मात्र यापैकी काही झालेले नाही. फडणवीस यांचे म्हणणे तुम्ही
फार गांभीर्याने घेऊ नका, असा टोला
बाळासाहेब थोरात यांनी लगावला होता. थोरात यांच्या टीकेवर गोपीचंद पळकर यांनी
प्रत्युत्तर दिलं आहे.
'महसूलमंत्री पदाच्या रस्सीखेचामुळं
काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे बरळू लागले आहेत. मुळात देवेंद्र फडणवीसांचे लग्न
विदर्भयात्रेच्या पाच वर्षाअगोदरच झाले आहे, याचेही भान
यांना राहिले नाही,' अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
काय म्हणाले बाळासाहेब
थोरात?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे
तुम्ही फार गांभीर्याने घेऊ नका. कारण त्यांच्या बोलण्यात आणि प्रत्यक्ष कृतीत फरक
आहे. सत्तेसाठी काहीही बोलायचे, नंतर कृती करायची नाही, हा भाजपचा पहिल्यापासूनचा
प्रयत्न आहे. जनमानसाला फसवणे आणि सत्ता मिळवणे हा उद्देश ठेवून ते अशी वक्तव्ये
करतात. स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, मंत्रिमंडळाच्या
पहिल्या बैठकीत धनगर आरक्षण सोडवू, असेही फडणवीस म्हणाले
होते. मात्र यापैकी काही झालेले नाही, असा टोला थोरात यांनी
लगावला होता.
देवेंद्र
फडणवीस काय म्हणाले?
भाजपने शनिवारी ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत
करावे, यासाठी चक्का जाम
आंदोलन केले होते. नागपुरात फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. त्या वेळी,
‘सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेले आहे. आमच्या हातात पुन्हा
सूत्रे दिली, तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन,
नाही तर राजकारणातून संन्यास घेईन,’ असे
वक्तव्य फडणवीस यांनी केले होते.
0 टिप्पण्या