Ticker

6/Breaking/ticker-posts

धक्कादायक : कोव्हिशील्ड लशीमुळे चेतासंस्थेचा विकार, केरळमध्ये आढळले ७ रुग्ण

 *पहिल्यांदाच कोव्हिशील्ड लशीचा दुष्परीणाम समोर

*केरळ आणि ब्रिटनमध्ये आढळले रुग्ण

 *११ जणांना चेतासंस्थेचा दुर्मीळ आजार











लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 नवी दिल्ली : 'अॅस्ट्राझेनेका' आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोव्हिशील्ड लस घेतल्यानंतर ११ जणांना 'गिलियन-बार सिंड्रोम' हा चेतासंस्थेचा दुर्मीळ आजार झाल्याचे दोन वेगवेगळ्या अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. यातील सात रुग्ण केरळमधील असून, चार जण ब्रिटनमधील नॉटिंगहॅम येथील आहेत. या सर्वांना हा आजार होण्याच्या दहा ते २२ दिवस आधी लस देण्यात आली होती. ' गिलियन-बार सिंड्रोम'मध्ये आपली रोगप्रतिकारशक्ती आपल्याच मेंदू आणि मज्जारज्जूच्या बाहेरील चेतासंस्थेवर चुकून हल्ला करते. यााबतचा संशोधन अहवाल 'जर्नल ऑफ अॅनल्स ऑफ न्यूरॉलॉजी'मध्ये १० जून रोजी प्रकाशित झाला आहे.

 

डेल्टा प्लसचे देशात २२ रुग्ण
डेल्टा प्लस या करोनाच्या नव्या विषाणूचे देशात २२ रुग्ण आहेत. त्यातील १६ रुग्ण महाराष्ट्रातील असून, उरलेले केरळ आणि मध्य प्रदेशातील आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिली.


जगातील दहा देशांत आतापर्यंत डेल्टा प्लस विषाणू आढळला आहे. त्यात भारताचाही समावेश आहे,’ असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, जपान, पोलंड, नेपाळ, चीन आणि रशिया या देशांतही हा विषाणू आढळला आहे. हा विषाणू सध्या चिंतेचे कारण ठरत आहे,’ असेही भूषण म्हणाले. महाराष्ट्रात रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्यांत या विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेशने या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी सूचनाही भूषण यांनी केली.


या विषाणूची आधीची आवृत्ती असलेला डेल्टा विषाणू जगातील ८० देशांत आढळला होता.

डेल्टा प्लस अधिक घातक
*याची संसर्गजन्यता किंचित कमी
*उलट हा विषाणू फुफ्फुसातील पेशींना घट्ट चिकटतो

* मोनोक्लोनल प्रतिपिंडाचा प्रतिसाद कमी करतो
* त्यामुळे प्राणघातकता अधिक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या