अमेरिकन लस फायजर भारतात दाखल होणार
लोकनेता
न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अमेरिका-इंडिया चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या
भारत-अमेरिका औषधे आणि आरोग्य सेवा परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. करोनाच्या
संसर्गाविरोधात फायजरने एक योजना तयार केली आहे. त्यानुसार भारतासह मध्य आणि निम्न
उत्पन्न असलेल्या देशांमध्ये लशीचे कमीत कमी दोन अब्ज डोस मिळतील.
डॉ. बोर्ला यांनी सांगितले की, भारतीय आरोग्य अधिकारी आणि संबंधित
विभागाकडून कराराला अंतिम स्वरूप लवकरच मिळेल. जेणेकरून आम्ही तातडीनेभारतात लस
पाठवण्यास सुरुवात करू शकतो. आम्ही भारत सरकारसोबत चर्चा करत असून ही चर्चा अंतिम
टप्प्यात आहे. लवकरच लशीबाबतचा करार होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भारतासाठी पाच
कोटी डोस
दरम्यान, याआधी फायजरने पाच कोटी डोस याच वर्षी उपलब्ध करून देण्याचे संकेत दिले
होते. त्यापैकी एक कोटी डोस जुलै महिन्यात, ऑगस्टमध्ये एक
कोटी डोस, सप्टेंबर महिन्यात दोन कोटी डोस आणि ऑक्टोबर महिन्यात
एक कोटी डोस भारतात फायजरकडून उपलब्ध केले जाऊ शकतात.
अशी असेल किंमत?
भारतात फायजरच्या लशीच्या एका डोसची किंमत १० डॉलर
(जवळपास ७३० रुपये) असू शकते. जगात एमआरएनए लशीची ही सगळ्यात कमी किंमत असणार.
ब्रिटन, अमेरिका आणि
युरोपीयन युनियनपेक्षाही निम्म्या किंमतीत ही उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे 'बिझनेस टुडे'ने म्हटले.
0 टिप्पण्या