*कष्ट करत तरुणाचा वैज्ञानिक कलेचा अविष्कार
*पान स्टॉल चालवत पठ्ठ्याने
तयार केली इलेक्ट्रीक चार्जवरील सायकल
*फक्त ५ रुपयात करणार प्रवास
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलचे भाव वाढत
आहेत. त्यामुळे वाहन चालविणे अवघड झाले आहे. त्यावर पर्यायी मार्ग काढत अर्धापूर
शहरातील बसवेश्वर चौक परिसरामध्ये राहात असलेल्या शिवहार प्रकाश घोडेकर या ३२
वर्षीय तरुणाने इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालणारी प्रदूषण मुक्त अशी सायकल तयार केली
आहे. पाच रुपये खर्चामध्ये चार तास चार्ज केल्याने तब्बल चाळीस किलोमीटरचे अंतर
सायकलने पार करता येत.
शिवहारने अर्धापूर शहरामध्ये पान स्टॉलचे
दुकान चालवत शिक्षण पूर्ण केले. आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेत वायरमॅनचा कोर्स पूर्ण केला.
त्यानंतर त्याने रेल्वे डिव्हिजनमध्ये तीन वर्ष व महावितरणमध्ये तीन वर्ष कंत्राटी
पदावर काम केले. गेल्या दोन वर्षापासून कोणतेही काम नसल्याने ते पानठेला चालवायचे.
लॉकडाऊनमुळे सर्व अस्थापना बंद असल्याने त्यांनी चार्जिंगवरील सायकल बनवण्याचा
प्रयोग करण्याचा संकल्प केला.
विजेवर
चालणारी सायकल तयार करत आपले स्वप्न सत्यात उतरविले आहे. त्यांच्या या वैज्ञानिक
कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे. पेट्रोल डिझेलवर चालणारी वाहने अनेकांनी बघितली
आहेत. मात्र, चार्जिंगवर बनवलेली सायकल
पहिल्यांदाच बघण्यात येत असल्याने नागरिकांना कुतूहल वाटत असून ही सायकल
बघण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.
सदरील सायकल तयार करण्यासाठी १४ हजार रुपये खर्च आला
असून मोटार २४ होल्ट ३५० वॅट, बॅटरी २४ होल्ट ३५० वॅट, चार्जिंग किट, लाईट, गिअर एक्सलेटर, इलेक्ट्रिक
ब्रेक आदींसह वेल्डींगचा वापर करत ही सायकल बनविण्यात आली आहे.
0 टिप्पण्या