Ticker

6/Breaking/ticker-posts

मुस्लिम आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात ; ५ जुलैला विधानभवनवर मोर्चा

 वंचित बहुजन आघाडी, रझा अकादमीचाही सहभाग






लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 मुंबई: मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा धगधगत असताना आता मुस्लिमांच्या आरक्षणाचा मुद्दाही चर्चेत येऊ लागला आहे. मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण दयावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीसोबत  रझा अकादमी येत्या ५ जुलैला विधानभवनावर भव्य मोर्चा काढणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत ही घोषणा केली.

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाबाबत निर्णय दिला असला, तरी देखील मुस्लिमांच्या आरक्षणाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. असे असतानाही धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसने अजूनही मुस्लिम समाजाला आरक्षण दिलेले नाही. याचा कारणासाठी येत्या ५ जुलैला विधानसभवनावर सरकारविरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. हा मोर्चा वंचित बहुजन आघाडी आणि रजा अकादमीतर्फे काढण्यात येत असल्याचेही आंबेडकर म्हणाले.

राज्यात करोनाचे संकट आहे. करोनाच्या लाटांवर लाटा येऊ लागल्या आहेत. मात्र असे असले तरी आम्ही मोर्चा काढणारच, असा निर्धार आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. कोर्टाने मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण मान्य केलेले आहे. मात्र, सरकारने अद्याप ते जाहीर केलेले नाही. आता सरकारने ते जाहीर करावे, असे आवाहन आंबेडकर यांनी केले आहे.


वंचिच बहुजन आघाडी आणि रजा अकादमीतर्फे काढण्यात येत असलेल्या मोर्चाची माहिती देताना प्रकाश आंबेडकर यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. भाजपचे राजकारण आता लोकांच्या लक्षात आले असून उत्तर प्रदेशात दंगल व्हावी यासाठी प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. हे लक्षात घेता दंगल भडकवणाऱ्या व्यक्तीविरोधात कायदा होणे गरजेचे असून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांना कायद्यानुसार शिक्षा व्हायला पाहिजे, असे आंबेडकर पुढे म्हणाले. याबाबच महाराष्ट्र सरकारबरोबरच केंद्र सरकारनेही निर्णय घेतला पाहिजे, असे ते म्हणाले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या