*मुस्लिम मतांचा विचार न करता ही आघाडी शक्य नाही.
*पवारांच्या घरी झालेल्या
बैठकीवर जलील बोलले.
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
शरद पवार यांच्या निवासस्थानी काल झालेल्या
बैठकीचे अनेक अर्थ काढले जात आहेत. ' शरद पवार यांनी ही बैठक बोलावली नव्हती. यशवंत सिन्हा यांच्या पुढाकाराने
ही बैठक झाली. भाजप वा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात
आघाडी उभारण्यासाठी ही बैठक नव्हती. या बैठकीचं आमंत्रण काँग्रेसलाही देण्यात आलं
होतं', असं
स्पष्टीकरण बैठकीनंतर राष्ट्रवादीकडून देण्यात आलं असलं तरी प्रत्यक्षात तिसरी
आघाडी उभी करण्यासाठी हालचाली सुरू आहेत आणि पवारांच्या घरी झालेली बैठक त्याचाच
भाग आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. याअनुषंगाने तिसरी
आघाडी झालीच तर त्या आघाडीचे नेतृत्व शरद पवार करणार का?, पवारांसोबत
कोणते पक्ष असतील?, याचा अंदाज या बैठकीतून आला आहे. बैठकीला
यशवंत सिन्हा, सपाचे घनश्याम तिवारी, राष्ट्रीय
लोकदलचे जयंत चौधरी, आम आदमी पक्षाचे सुशील गुप्ता, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला ,संयुक्त जनता दलाचे पवन वर्मा, संजय झा आदी नेते उपस्थित
होते. त्यावरच बोट ठेवत जलील यांनी मुस्लिम मतांचा विचार न करता अशी कोणतीही आघाडी
शक्य नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.
' देशात लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप
विरोधी आघाडी तयार करण्यात येत आहे. मात्र कोणतीही आघाडी मुस्लिम मतांचा विचार न
करता शक्य नाही', असे जलील म्हणाले. 'एमआयएम
पक्षासोबत मुस्लिम धर्मीय आहेत. त्यामुळे शरद पवार हे फारूख अब्दुल्ला यांना
आघाडीत सोबत घेणार असतील तर ही आघाडी प्रभावी राहणार नाही', असे
महत्त्वाचे मतही इम्तियाज जलिल यांनी व्यक्त केले.
0 टिप्पण्या