Ticker

6/Breaking/ticker-posts

नवी मुंबईत करोना रुग्णसंख्या वाढल्याने चिंता

 


लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

 नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये गेल्या महिन्यापर्यंत कमी झालेली करोना रुग्णांची संख्या आता वाढायला सुरुवात झाली आहे. दररोज सापडणाऱ्या करोनाबाधित रुग्णांची संख्या सरासरी ५० ते ७० पर्यंत खाली आली होती. मात्र २० जूनपासून ही संख्या वेगाने वाढू लागल्याने आजपासून शहरात नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत .

गेल्या आठवडयापासून रूग्णसंख्या १००च्या पुढे जाऊ लागली आहे. आता ती १५० पर्यंत आली आहे. तपासणीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अहवालांचा आकडा पाहता ही संख्या अजून वाढणार असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे महापालिकेची चिंता वाढली आहे. .

महापालिका हद्दीत एकूण करोना रुग्णांची संख्या १ लाख ३९४ इतकी झाली आहे. मुंबई महापालिका हद्दीत सध्याची उपचार सुरू असलेली असलेली करोना रुग्णसंख्या १५२५ इतकी आहे. तर दररोज सापडणारे करोना रुग्ण १५०च्या पुढे गेले आहेत. २० जूनपर्यंत दररोज सापडणाऱ्या करोना रुग्णांची संख्या १००च्या आत होती. मात्र २१ जूनपासून रोजच्या रुग्णसंख्येत वाढ पाहायला मिळत आहे. शिवाय, रोज मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही ५ ते ६ इतकी आहे. यामुळे महापालिकेने कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.

१७ जून रोजी सापडलेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या १६० इतकी आहे. तर मृत्यूसंख्या ६ आहे. तपासणी प्रक्रियेत असलेल्या अहवालांची संख्या ३४१६ इतकी आहे. त्यामुळे करोना रुग्णसंख्या आता वाढत जाणार असल्याचेच चित्र निर्माण झाले असून नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन करण्यात आले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या