लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
औरंगाबाद : नगरवरून आपल्या मित्राच्या कारमध्ये बसून वाळूज येथील ओएसिस
चौकात उतरलेल्या एका प्रवाशाला रस्त्यात रिक्षाचालकाने लुटले. ही घटना शनिवारी
पहाटे घडली. या प्रकरणाची तक्रार छावणी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
या प्रकरणात समाधान
विश्वनाथ तायडे (४०, रा. ऑडीटर सोसायटी, मयुर पार्क) हे व्यापारी असून, त्यांची ट्रॅक्टर
एजन्सी आहे. समाधान तायडे हे १९ जून रोजी नगर येथून औरंगाबादला येण्यासाठी
मित्रासोबत कारने निघाले होते. १९ जूनला पहाटे ३ वाजता ते वाळूज येथील ओएसिस चौक
येथे पोहोचले. ओएसिस चौकात उतरल्यानंतर त्यांचा मित्र निघून गेला. तायडे हे आपल्या
घरी जाण्यासाठी त्यांनी रिक्षाचालकाचा शोध घेतला. एका रिक्षा चालकाने त्यांना
सोडण्याचे कबुल केले. या रिक्षात बसून तायडे हे येत असताना नगररोडवरील महालक्ष्मी
मंदिराजवळ रिक्षा चलाकाने रिक्षा थांबविला. तसेच समाधान तायडे यांच्या खिश्यातील
दोन मोबाईल हिसकावून घेतले. तसेच त्यांच्या पॅन्टच्या खिशातील ट्रॅक्टर एजन्सीचे
५२ हजार रूपये असा एकुण १ लाख ४२ हजार रुपयांचा माल घेऊन रिक्षा चालक पसार झाला.
या प्रकरणी समाधान तायडे याच्या
फिर्यादीवरून त्यांना लुटणाऱ्या रिक्षा चालकाच्या विरोधात छावणी पोलिस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग
भागिले करित आहेत.
0 टिप्पण्या