Ticker

6/Breaking/ticker-posts

मंत्रालय बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा पुणे पोलिसांच्या ताब्यात

 *ई-मेलद्वारे मंत्रालय  उडविण्याची दिली होती धमकी

*शैलेश शिंदेस पोलीसानी घोरपडी येथुन घेतले ताब्यात





लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

पुणे: शाळेत मुलीचे ॲडमिशन न झाल्यामुळे ई-मेलद्वारे मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणार्‍या व्यक्तीला पुणे पोलिसांनी घोरपडी येथून ताब्यात घेतले. मुंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश शिंदे असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो घोरपडी येथे राहतो. पोलिसांनी त्याला सोमवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले. शिंदे याने सोमवारी ही धमकी दिली होती.


शैलेश शिंदे याच्या मुलाला शाळेत प्रवेश मिळाला नसल्याने चिडलेल्या शैलेशने गृह विभागाला धमकीचा मेल केला असे प्राथमिक तपासात आढळून आले आहे.

मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याची धमकी देणारा ई-मेल आज संध्याकाळी ६ वाजता प्राप्त झाल्यानंतर डॉगस्कॉडद्वारे मंत्रालयात शोध घेण्यात आला. मात्र कोणतीही स्फोटक वस्तू आढळून आली नाही. मात्र खबरदारी म्हणून मंत्रालय परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. त्यानंतर मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात अज्ञातविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मे महिन्यातही पसरली होती अफवा

मे महिन्यात देखील मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली होती. एका अज्ञात व्यक्तीने मंत्रालयात फोन करुन बॉम्ब ठेवल्याचे सांगितले होते. मात्र, काहीवेळानंतर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले होते. नागपूरमधील सागर मंदेरे या तरुणाने हा फोन केला होता असे स्पष्ट झाले. हा तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या