'सीरम'च्या सीईओंची माहिती; अदर पुनावाला यांच्याकडून आपल्या टीमचं कौतुक
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
यासंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचे चीफ सीईओ अदर पुनावाला यांनी ट्विट करून माहिती दिलीय. ' पुण्यातील
संस्थेत या आठवड्यात कोवोवॅक्सच्या पहिल्या बॅचची निर्मिती होताना पाहण्यासाठी मी
उत्सुक आहे. या लशीत १८ वर्षांहून कमी वयाच्या आपल्या भावी पीढीचं संरक्षण
करण्याची क्षमता आहे. लशीची ट्रायल अद्याप सुरू आहे. वेल डन टीम सीरम इन्स्टिट्यूट
ऑफ इंडिया' असं ट्विट करत अदर पुनावाला यांनी आपल्या
टीमचं कौतुक केलंय.या लसीचं 'ब्रिजिंग ट्रायल'ही अंतिम टप्प्यात आहे. याचाच अर्थ देशाला लवकरच आणखी एक करोना लस मिळणार आहे. येत्या महिन्यात देशभरात मुलांवरदेखील 'कोवोवॅक्स' या लसीच्या क्लिनिकल ट्रायल सुरुवात होणार आहे.
अमेरिकेचे
बायोटेक्नोलॉजी कंपनी 'नोवावॅक्स'कडून
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी करोना लशीसंदर्भात
करार करण्यात आला होता. ' नोवावॅक्स'ची
करोना प्रतिबंधक लस भारतात 'कोवोवॅक्स' नावानं ओळखली जाणार आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत ही लस भारतात लॉन्च
होण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्यापासून सीरम
इन्स्टिट्यूटकडून अॅस्ट्रेजेनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या 'कोव्हिशिल्ड' या
करोना लसीची निर्मिती सुरू आहे. याशिवाय 'भारत बायोटेक'ची कोव्हक्सिन आणि रशियाची 'स्पुतनिक व्ही' या लशींचाही करोना लसीकरण मोहिमेत
मोलाचा वाटा आहे.
0 टिप्पण्या