सहमती एक्सप्रेस शहर विकासासाठी नसून वैयक्तिक स्वार्थासाठी - किरण काळे
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
१) नगर शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यांमध्ये खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे तेच नागरिकांना समजेनासे झाले आहे.
२) तपोवन
रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे नागरिकांची फसवणूक झालेली आहे. शहरातील सर्व
रस्त्यांची कामे अशाच पद्धतीने निकृष्ट झाली असल्यामुळे एकाच पावसामध्ये सदर कामे
पावसाच्या पाण्यात वाहून हा कायमच अनुभव नगरकरांना आहे.
३) भुयारी गटार योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
४) अमृत पाणी योजनेचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही.
५) नागरिकांना आजही दिवसाआड पाणी मिळते आणि अनेक ठिकाणी हेच
प्रमाण तीन ते चार दिवसांचे आहे. तसेच पाणी पूर्ण दाबाने मिळत नाही. मैलामिश्रित
पाणी अनेक वेळेला लोकांना पुरविले जाते. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण
होतात.
६) अजूनही घंटागाड्या शहराच्या सर्व भागांमध्ये पोहोचत
नाहीत.
७) पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईची कामे झालेली नाहीत. यामुळे
नागरिकांच्या घरात दरवर्षीप्रमाणे पाणी शिरणार आहे.
८) ओढे, नाल्यांमध्ये बिल्डर लोकांच्या फायद्यासाठी
राजकीय वरदहस्त यामुळे, महानगरपालिकेच्या पाठबळामुळे
अतिक्रमण झाले आहे. यामुळे शहराच्या सांडपाणी व्यवस्थापणाच्या नैसर्गिक रचनेवर
घाला घालण्याचे काम मनपाने केले आहे.
९) हॉकर्स झोन / फेरीवाला संरक्षण कायद्याची अंमलबजावणी
शहरात झालेली नाही. यामुळे भाजीवाले, फेरीवाले फळवाले अशा छोट्या
घटकातील लोकांना महापालिका अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली सतत वेठीस धरत असते.
त्यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
१०) नेहरू मार्केटची पूनरउभारणी अद्याप होऊ शकलेली नाही.
११) प्रोफेसर कॉलनी
संकुलाचा प्रश्न निकाली काढता आलेला नाही.
१२) सावेडीतील नाट्यगृहाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही.
१३) नगर शहराचा उपनगरांमध्ये झालेला विकास लक्षात घेता
सावेडी मध्ये स्वतंत्र स्मशानभूमीची गरज आहे. त्याचाही प्रश्न प्रलंबित आहे.
१४) विविध कामांच्या नावाखाली शहरांमध्ये नियोजनशून्य
पद्धतीने काम सुरू असल्यामुळे जागोजागी खोदकाम करून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे
चिखल साचला असून लोकांना रस्त्याने जीव मुठीत धरून वावरावे लागते.
१५) खेळांसाठी क्रीडांगणे विकसित करण्यात अपयश आले आहे.
१६) झोपडपट्ट्या असणाऱ्या परिसरांचा कोणत्याही प्रकारचा
विकास करू शकलेले नाहीत.
१७) मनपाच्या शाळांची दुरावस्था झालेली आहे.
१८) शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणारी सिटीबसची
दैना पाहता नगरकरांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा यातून देण्यामध्ये मनपा सपशेल
फेल ठरली आहे.
१९) शहरामध्ये
कुठेही सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था नाही. हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असणारी
शौचालय दुर्गंधीमुळे वापरासाठी योग्य नाहीत.
२०) मनपाला स्वतःचे हॉस्पिटल उभारता येऊ शकलेले नाही.
२१) बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाची अवस्था असून
नसल्यासारखी झालेली आहे.
२२) मनपाचे हॉस्पिटल नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना
कोरोनाच्या संकट काळामध्ये आरोग्यसुविधा, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे मनपाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना आपले
जीव गमवावे लागले आहेत. यामुळे शहरातील हजारो कुटुंबांना कधीही भरून न येणारा फटका
यातून बसला आहे.
२३) नगर शहरातील अजूनही बहुतांशी भाग हा स्ट्रीट लाईट अभावी
अंधारात आहे. असलेल्या स्ट्रीट लाईट पैकी अनेक लाईट हे आजही चालू
अवस्थेत नाहीत.
२४) डीपी रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत. असे आरोप करण्यात
आले आहेत.
0 टिप्पण्या