लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
पुणे : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरांवर आज सकाळी सक्त वसुली संचालनायलयाने (ईडी) छापे टाकले आहेत. या कारवाईमुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मी आतापर्यंत वैचारिक राजकारण पाहिलं, पण सूड घेण्यासाठी एखाद्या एजन्सीचा गैरवापर करत असल्याचं मी पहिल्यांदाच पाहत आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधत होत्या.
अनिल देशमुखांच्या ईडी छाप्याविषयी विचारलं असता विरोधी पक्षाकडून हे जाणूनबुजून केलं जात आहे. मी आतापर्यंत विचारांचं राजकारण पाहिलं आहे. विरोधकांच्या विरोधात राजकारण करण्यासाठी एजन्सीचा गैरवापर होत असल्याचं मी कधीही पाहिलं नाही असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
'पवार साहेबांनी विचारांचं राजकारण केलं पण...'
अनिल देशमुखांच्या ईडी चौकशीविषयी बोलताना सुप्रिया सुळे यांनी भाजपवर घणाघाती आरोप केला आहे. त्या म्हणाल्या की, 'पवार साहेबांनाही ईडीची नोटीस आली होती. पवार साहेबांनी वैचारिक राजकराण केलं पण कधीही सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना त्रास दिला नाही. यासाठी कोणत्याही तपास यंत्रणेची मदत घेतली नाही. पण अनिल देशमुखांच्या बाबतीतही हेच झालं आहे. हे जाणूनबुजून केलं जात आहे. पण ठीक आहे हम लढेंगे' असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
0 टिप्पण्या