लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई : मुंबईत सोमवारपासून ३० ते ४४
वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी खुल्या झालेल्या मोफत लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी
काही केंद्रांवर गोंधळ निर्माण झाला. त्यात दहिसर करोना केंद्रांवर लशींचा कमी
साठा असतानाच १८ ते ४४ आणि त्यापुढील वयोगटातील व्यक्ती लसीकरणासाठी आल्याने या
केंद्रावर प्रचंड गर्दी जमली होती. लस मिळणे अवघड ठरणार हे लक्षात येताच अनेक जण
घरी परतले. मात्र, पहिल्याच दिवशी उडालेल्या भंबेरीने पुढील
दिवसात कोणती स्थिती निर्माण होईल, याकडे सर्वांचे लक्ष
लागले आहे. केंद्र सरकारने १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी सोमवारपासून मोफत
लसीकरण सुरू केल्याने त्यापासून वंचित राहिलेल्या हजारो मुंबईकरांमध्ये उत्साह
निर्माण झाला. त्यात पालिकेने लशींचा मर्यादित साठा लक्षात घेऊन सुरुवातीच्या
टप्प्यात ३० ते ४४ वयोगटातील व्यक्तींनाच लस देण्याचे जाहीर केले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींनीही लसीकरण केंद्रांकडे
गर्दी केल्याचे दृश्य होते.
मुंबईतील सुमारे २५० लसीकरण केंद्रांवर ३० ते ४४
वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू हाती घेण्यात आले. मात्र, त्यापैकी दहिसर चेकनाक्याकडील दहिसर करोना
केंद्राकडे सोमवारपासून बरीच गर्दी जमली होती. सकाळच्या सत्रात इथल्या केंद्राकडे
सर्व वयोगटातील व्यक्तींची गर्दी जमली होती. पालिकेने लसीकरण केंद्रांकडे सध्या
लशींच्या १००ऐवजी ३०० लसींचा साठा पाठविण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरीही
लशींची मागणी आणि पुरवठ्यात बरेच अंतर असल्याने लस घेण्यासाठी उत्सुक असलेल्यांची
संख्या वाढत चालली आहे.
0 टिप्पण्या