Ticker

6/Breaking/ticker-posts

करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर... 'या' राज्यानं पूर्णत: लॉकडाऊन हटवला !

 


लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

हैदराबाद : करोना संक्रमणाची दुसरी लाट ओसरत असताना तेलंगना सरकरानं राज्यातून संपूर्णत: लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय जाहीर केलाय. लॉकडाऊन दरम्यान जारी करण्यात आलेले सगळे नियम अटी मागे घेत असल्याचं सरकारनं आपल्या आदेशात म्हटलंय.



' आरोग्य अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या अहवालानंतर  लॉकडाऊन हट्वण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोना संक्रमणाच्या रुग्णांची संख्या, पॉझिटिव्हिटी दरात घट झाल्याचं दिसून येतंय तसंच करोना संक्रमणही नियंत्रणात आला आहे' असा उल्लेख मुख्यमंत्री कार्यालयानं फेसबुकवर केलेल्या एका पोस्टमध्ये करण्यात आला आहे.



शुक्रवारी २४ तासांत राज्यात १४१७ नवीन करोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. तर १२ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय. शुक्रवारी १८९७ जण करोना संक्रमणातून बाहेर पडले आहेत. तर सध्या राज्यात १९,०२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

दुसरीकडे, केंद्र सरकारकडून राज्यांना लॉकडाऊन हटवताना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लॉकडाऊन हटवण्याची प्रक्रिया हळूवारपणे पार पाडणं गरजेचं असल्याचं केंद्रानं म्हटलंय. केंद्रीय ग्रुह सचिव अजय भल्ला यांनी राज्यांना लिहिलेल्या एका पत्रात करोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित केलंय. अनेक ठिकाणी अनलॉक दरम्यान बाजारांत गर्दी दिसून आल्यानंतर केंद्राकडून हे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या