कृषी अधिकारी सुधीर शिंदेंची पेरणीच्या चाड्यावर मुठ
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
साकत : शेतकरी बांधवांनी पेरणी योग्य पाऊस होईपर्यत पेरण्याची घाई - गडबड करू नये असे आवाहन कृषि अधिकारी सुधीर शिंदे यांनी,केले आहे . दरम्यान शेतकऱ्याना बि- बियाणे , खते मिळाले का ? याची थेट बांधावर जाऊन चौकशी करणारे तालुका कॄषी अधिकारी सुधीर शिंदे यांनी चक्क चाड्य्यावर मुठ धरून पेरणी प्रात्यक्षिक करून दाखवल्याने साकत परिसर तील शेतकऱ्यांमध्ये हाच चर्चाचा विषय बनला आहे .
यावेळी शिंदे यांनी कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे अभिजित गदादे, मंडल कृषी अधिकारी के.एम.हिरडे , कृषी पर्वेक्षक ए. यु. कदम , सुरेश वराट , कृषी सहाय्यक प्रशांत जाधव , तंत्रज्ञान व्यवस्थापक तुषार गोलेकर , गणेश वारे , कृषी विभागाची संपूर्ण टीम घेऊन साकत परिसरातील दिव्यांग , महीला दुर्बल घटकातील शेतक -यांच्या शेतात जाऊन भेटी घेऊन त्यांची विचार पुस करून अडी- अडचणी समजुन घेतल्या .
शिंदे म्हणाले की . शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे विकत घेण्यापेक्षा आपले घरातील दुरीचे बियाणे वापरावे , बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी त्यामुळे अनेक रोगापासून बचाव होतो व उगवणक्षमता वाढते यावेळी बीज प्रक्रिया व पिकाची उगवण क्षमता प्रात्यक्षीक करून दाखवले बि- बियाणे मिळाले का काही अडचण आली तर मला फोन करा शासनाने मला आपली मदत करण्यासाठी धाडले आहे .शेती सुधारीत पध्दतीने करण्याचे अव्हान केले. अविनाश लहाने , जगन्नाथ मुरूमकर ' प्रविण वराट ' महादेव वराट , युवराज वराट खंडु घोलप , राम गायकवाड , मुकेश वराट , बाळासाहेब वराट , ताई लहाने , चंद्रकला गायकवाड , अश्वीनी वराट आदी शेतकऱ्यांच्या शेतात भेटी दिल्या
साकत गाव मराठवाड्याचे प्रवेश द्वार असल्याने शेजारी शेतकरी कृषी विभागाचे कौतुक करत म्हणत होते तुम्ही नशीबवान आहात , गड्यानो अखंड मानवजातील शरीराचे कार्य पुर्ण क्षमतेने चालविण्यासाठी आवश्यक असलेले अन्न पुरविणाऱ्या शेतकरी हा अनादी काळापासुनच कशाचीही पर्वा न करता शेती कसत आला आहे . काळ्या आईची ओटी भरायची ही शेतकऱ्यांची परंपरा आहे . त्यामुळे कोरोना सारखे आजार येतात आणि जातात मात्र शेतकरी कष्ट करावयाचे थांबत नाही . मग आम्ही थांबवुन कसे चालनार शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे हे तर आमचे कर्तव्य आहे. असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले .
"जामखेड कृषी विभागाकडून आम्हाला नेहमी सहकार्य मिळते आम्ही फोन केला की आम्हाला थेट बांधावर येऊन कोणती फवारणी करावी यांची माहीती आधिकारी देतात"
-बाळासाहेब वराट (दिव्यांग शेतकरी )
"आमच्या शेतात येऊन पेरणी करुन मार्गदर्श करणे व अडी- अडचणी समजुन घेऊन प्रत्यक्ष करून दाखवल्याने आम्हाला आमचा शेतकरी पोरगा आधिकारी मिळाला असे वाटते ."
-चंद्रकला गायकवाड (माहिला शेतकरी )
0 टिप्पण्या