आरोपींना पोलीस कोठडी
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नाशिक : रविवारी इगतपुरी येथे रेव्ह पार्टीवर नाशिक ग्रामीण पोलीसांनी धाड टाकली होती. त्या प्रकरणात २९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांना सोमवारी न्यायालया समोर हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली .
काही आरोपींना एक दिवस तर इतर आरोपींना नऊ दिवस न्यायलीयन कोठडी
सुनावण्यात आली आहे. ज्या आरोपींची एक दिवसाची मुदत संपली त्यांना २९ जूनला
न्यायालयासमोर हजर करण्यात आलं तेव्हा न्यायालयाने त्यांना पाच जुलैपर्यंत पोलीस
कोठडी सुनवाली आहे.
दरम्यान, या कारवाईनंतर पोलीस अधीक्षक सचिन पाटिल म्हणाले की, सध्या असले प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढ्ले असून खाजगी घरे , बंगले भाड्याने देताना नागरिकानी पुर्ण भाडेकरूंची माहिती घ्यावी तसेच काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन केले.
0 टिप्पण्या