शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे नव्या
महापौर तर राष्ट्रवादीचे गणेश भोसले उपमहापौर
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
उद्या बुधवारी ३० रोजी या पदाधिकाऱ्यांची निवड
करण्यासाठी ऑनलाइन सभा बोलाविण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत आज
दुपारपर्यंत होती. महापौरपदासाठी ठरल्याप्रमाणे कालच शिवसेनेच्या शेंडगे यांचा
एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता. राष्ट्रवादीला उपमहापौरपद मिळाले आहे. मात्र, त्यासाठी उमेदवार ठरत नव्हता. आज
पुण्याहून पक्ष निरीक्षक अंकुश काकडे नगरला आले होते. त्यांनी आणि राष्ट्रवादीचे
आमदार संग्राम जगताप यांनी उच्छुकांशी चर्चा केली. अर्ज दाखल करण्याच्या काही वेळ
आधी गणेश भोसले यांचे नाव निश्चित करण्यात आले. त्यांचा अर्जही लगेच दाखल करण्यात
आला. मुदत संपली तेव्हा या दोन्ही पदांसाठी फक्त एक एकच अर्ज दाखल झाल्याने. दोन्ही
पदांची निवड बिनविरोध झाली आहे.
पूर्वी शिवसेनेच्या
जास्त जागा असूनही राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपचे महापौर व उपमहापौर होते.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर यात बदल करण्याची मागणी झाली. आता
निवडणुकीपूर्वी यासंबंधीच्या हालचालींनी वेग आला. मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादी
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थित बैठक होऊन पदांचे वाटपही झाले. या
प्रक्रियेपासून काँग्रेसला दूर ठेवण्यात आले होते. असे असले तरी निवडणूक जाहीर
होण्यापूर्वीच काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला होता. शिवसेना-राष्ट्रवादी
यांचे एकत्र येण्याचे ठरल्यावरही काँग्रेसच्या उनेदवाराने अर्जही नेला. मात्र, तो अखेरपर्यंत दाखल केला
नाही. अत्यल्प जागा असूनही काँग्रेसने उमेदवार जाहीर केला होता. आधीच स्थानिक
पातळीवर काँग्रेसव राष्ट्रवादीचे बिनसले आहे. त्यात भर म्हणजे
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आजिबात रस दाखविला नाही. आघाडी करण्याच्या
निर्णयातही स्थानिकच नव्हे तर वरिष्ठ नेत्यांनाही सोबत घेण्यात आले नव्हते. तरीही काँग्रेसचे
पाचपैकी चार नगरसेवक भोसले यांचा अर्ज दाखल करताना उपस्थित असल्याचे दिसून आले. त्यामुळे
पालिकेतील राजकारण कोणत्या दिशेने गेले हे स्पष्ट होते.
महापालिकेत
विरोधक कोण?
आता नगरचे राजकारण वेगळ्या वळणावर आले
आहे. पूर्वी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजची सत्ता होती. तेव्हा शिवसेना
विरोधकाच्या भूमिकेतून दोघांनाही टार्गेट करीत असे. आता अधिकृत विरोधकाच्या
भूमिकेत भाजप असला तरी त्यांची राष्ट्रवादीशी स्थानिक पातळीवरील जुनी
मैत्री कायम राहण्याची शक्यता असल्याने भाजपकडून सत्ताधारी शिवसेनेला जास्त टर्गेट
केले जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पूर्वीही दुर्लक्षित राहिलेल्या काँग्रेस
यापुढेही संघर्षच करीत राहणार की फरपटत आघाडीसोबत येणार, याची उत्सुकता आहे.
काय म्हणाले अंकुश काकडे ?
राष्ट्रवादीचे अंकुश काकडे यांनी मात्र
महाविकास आघाडी कायम असल्याचे सांगितले, ते म्हणाले, राज्याच्या सत्तेत
शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सहभागी आहे. राज्यातील हीच आघाडी नगरमध्येही एकत्र
आहे. त्यामुळे आता नगरच्या विकासाला चालना मिळणार आहे. भाजपाने शांत राहून एक
प्रकारे तेही आमच्यासोबत आहेत. त्यामुळे आता नगरचा चांगला विकास होईल, असे सांगायला काकडे विसरले नाहीत.
0 टिप्पण्या