लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
बीजिंग: नव-नवीन तंत्रज्ञानामुळे चीनची जगभरात
चर्चा होत असते. अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेवर लोकांना विश्वास ठेवणे कठीण
जात आहे. चीनमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून १० मजली इमारत उभारण्यात आली. मात्र,
इमारत उभारण्यास फक्त २८ तास आणि ४५ मिनिटांचा कालावधी लागला. साधारणपणे
एखाद्या इमारतीचा पाया भरण्यासाठी किमान आठवड्याचा कालावधी लागतो. त्यामुळे
चीनच्या अभियंत्यांनी केलेल्या करामतीमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
चीनच्या चांग्शा शहरात ही आश्चर्यजनक घटना घडली. चांग्शामध्ये
२८ तास आणि ४५ मिनिटांमध्ये १० मजली इमारत उभारून तयार करण्यात आली. इतक्या कमी
वेळेत इमारत तयार करणाऱ्या विकासकांनी १३ जून रोजी याचा पाच मिनिटांचा व्हिडिओ
जाहीर केला आहे. यामध्ये इमारतीचा पाया रचण्यापासून पूर्ण इमारत तयार करण्याची
माहिती देण्यात आली आहे.
0 टिप्पण्या