Ticker

6/Breaking/ticker-posts

रेव्ह पार्टीवर पोलिसांची धाड ; ‘बिग बॉस’ फेम चार अभिनेत्रिंसह २२ जणांना अटक

 इगतपुरीत रिसॉर्टमध्ये सुरू होती रेव्ह पार्टी; रेड पड्ताच पळापळ

 


लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 नाशिकः पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या इगतपुरी येथे रेव्ह पार्टी करणं तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे. इगतपुरीतील एका रिसॉर्टमध्ये सुरु असणाऱ्या रेव्ह पार्टीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी धाड टाकली आहे. यावेळी पोलिसांनी २२ जणांना अटक केली असून यात चित्रपटसृष्टीतील चार महिलांचा समावेश आहे. मध्यरात्री  रेड पडताच एकच पळापळ उडाली. अनेक जन ड्रग्जच्या नशेत तर्रर असल्याने धडपडून एकमेकांचे अंगावर कोसळ्ले.

 

मुंबई- आग्रा महामार्गावरील दोन बंगल्यात रेव्ह पार्टी सुरु होती. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या टीमनं या रिसोर्टवर धाड टाकली. यावेळी महिला व पुरुष पार्टीत होते. मध्यरात्री दोन वाजता पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या पार्टीत मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या चार महिलाही होत्या. तसंच, ‘बिग बॉस या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलेचाही सामावेश आहे. त्याशिवाय १० पुरुष आणि १२ महिलांसह एकूण २२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

 

इगतपुरीतील एका रिसॉर्टमध्ये अवैध काम सुरु असल्याची टीप पोलिसांना मिळाली. या माहितीनुसार पोलिसांनी रिसॉर्टमधील बंगल्यावर कारवाई केली. यावेळी पार्टीत सहभागी झालेले लोक ड्रग्ज आणि हुक्काचं सेवन करत होते, अशी माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या