लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नवी दिल्लीः प्रसिद्ध मेसेजिंग अॅप Whatsappचा वापर
आता जवळजवळ सर्वच जण करीत आहेत. आपण बऱ्याचदा Whatsapp चे
मेसेज यामुळे वाचत नाहीत कारण, त्या समोरच्या व्यक्तीला
तुम्ही ऑनलाइन असल्याचे लक्षात येईल. जर तुम्हाला चॅटिंग करायची असेल परंतु,
काही लोकांना माहिती होऊ द्यायचे नसेल तर एक जबरदस्त ट्रिक्स आहे. तुम्ही
व्हॉट्सअॅप चॅटिंग करीत असूनही ऑनलाइन दिसणार नाहीत. जाणून घ्या डिटेल्स.
ही पहिली पद्धत
*सर्वात आधी आम्ही तुम्हाला
स्मार्टफोनच्या नोटिफिकेशन विंडोचा वापर करीत आहोत.
* ज्यावेळी व्हॉट्सअॅपवर एखादा मेसेज येतो. त्यावेळी त्याचे नोटिफिकेशन
तुमच्या फोनवर येत असतात.
* जर तुम्ही खूपच जुना फोन वापरत असाल तर मेसेजच्या खाली रिप्लायचा ऑप्शन
मिळतो.
*या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही व्हॉट्सअॅप न
ओपन करताच मेसेजचे उत्तर देऊ शकता.
* असे केल्यास तुम्हाला हा फायदा मिळेल की, लास्ट सीन
स्टेट्स मध्ये कोणताही बदल होणार नाही.
* म्हणजेच दुसऱ्या लोकांना तुम्ही ऑनलाइन आहात हे समजणार नाही.
ही दुसरी पद्धत
* यासाठी सर्वात आधी तुम्हाला आपल्या स्मार्टफोनच्या मोबाइल डेटा आणि वायफाय
कनेक्शन बंद करावे लागेल.
* यानंतर Whatsapp ओपन करा. त्या मेसेजमध्ये जाऊन रिप्लाय करा.
* आपला मेसेज टाइप करा आणि पाठवा. सध्या हा मेसेज सेंड होणार नाही.
* आता व्हॉट्सअॅप बंद करा.
* स्मार्टफोनच्या इंटरनेटला पुन्हा चालू करा.
* टाइप केलेला मेसेज जाईल. तसेच तुम्ही ऑनलाइन आहात हे कुणाला समजणार नाही.
0 टिप्पण्या