Ticker

6/Breaking/ticker-posts

LIC ची 29 कोटी पॉलिसीधारकांसाठी मोठी घोषणा, आता घर बसल्या पैसे मिळणार, ‘ही’ सुविधा सुरू

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क

नवी दिल्लीः एलआयसी (LIC) या सरकारी संस्थेने लोकांच्या सेवेसाठी आणखी एक मोठे पाऊल उचललेय. कोरोना साथीच्या आजाराशी झुंज देणाऱ्या लोकांसाठी पॉलिसी क्लेमच्या नियमात सूट देण्यात आलीय. क्लेम सेटलमेंटच्या दाव्यात काही शिथिलता दिली जात असल्याचं एलआयसीने एका परिपत्रकात म्हटलेय. कोरोना संकटात एलआयसीने आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी ही घोषणा केलीय.

 

पॉलिसीशी संबंधित दाव्यांचा तोडगा काढण्याबाबत सूट

एलआयसीने म्हटले आहे की, कोरोनाच्या सध्याच्या साथीच्या रोगात एलआयसी ग्राहकांच्या सुरक्षेची काळजी घेऊन पॉलिसीशी संबंधित दाव्यांचा तोडगा काढण्याबाबत काही सूट देत आहे. कंपनी दाव्यांची पूर्तता आणि प्रक्रिया पूर्वीच्या तुलनेत खूप सोपी आणि सुलभ करीत आहे.

मृत्यूच्या दाव्याचे नियम

मृत्यूच्या दाव्यांचा लवकर निपटारा करण्याचे नियम शिथिल करण्यात आलेत. कोरोना साथीच्या काळात रुग्णालयात एखाद्या क्लायंटचा मृत्यू झाल्यास, पालिकेकडून मृत्यू प्रमाणपत्राच्या जागी काही पर्यायी पुरावे देखील दिले जाऊ शकतात. या पुराव्यांमध्ये कोणतेही मृत्यू प्रमाणपत्र, डिस्चार्ज सारांश, शासन, ईएसआय, सशस्त्र सेना, कॉर्पोरेट हॉस्पिटल, एलआयसी वर्ग -1 अधिकारी किंवा 10 वर्षांचा अनुभव असलेले विकास अधिकारी, अंत्यसंस्कार प्रमाणपत्र, दफन यांसारखे मृत्यूचे दाखले कोणत्याही प्राधिकरणाद्वारे जारी केलेले प्रमाणपत्र दिले जाऊ शकते.

कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

कोरोना व्यतिरिक्त अन्य प्रकरणांमध्ये नगरपालिका मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक असेल. एन्युइटी पॉलिसीमध्ये पैसे मिळविण्यासाठी, जीवन प्रमाणपत्र देण्यापासून सूट देण्यात आलीय, जी 31.10.2021 पर्यंत लागू राहील. काही प्रकरणांमध्ये हयातीचा दाखला ईमेलद्वारे पाठविले जाऊ शकतात. एलआयसीने व्हिडिओ कॉल प्रक्रियेद्वारे हयातीचा दाखला मिळण्याची सुविधा सुरू केली आहे.

कागदपत्रे सादर करण्यात दिलासा

पॉलिसीधारकांनाही कागदपत्रे सादर करण्याची परवानगी आहे. हक्काच्या सेटलमेंटसाठी सर्व्हिसिंग शाखेत जाण्याची आता गरज भासणार नाही. मॅच्युरिटी किंवा सर्व्हायव्हल बेनिफिट क्लेमसाठी, आपण जवळच्या एलआयसी कार्यालयात कागदपत्रे देखील सबमिट करू शकता. एलआयसीने एनईएफटीच्या नोंदी ठेवण्याचे कामही सुरू केले आहे. एलआयसीने एनईएफटीकडून पेमेंट सुरू केले आहे, ग्राहकांना एलआयसी पोर्टलवर कागदपत्रे जमा करण्याचा पर्याय सुरू झालाय. यामुळे क्लेम सेटलमेंटला गती मिळेल.

कर्मचारी रजा

एलआयसीने सांगितले आहे की, आता त्यांचे कर्मचारी आठवड्यातून पाच दिवस काम करतील आणि ऑफिसशी संबंधित काम सोमवार ते शुक्रवार या कालावधीत असेल. शनिवार आणि रविवारी सुट्टी असेल. कार्यालयाचा कार्यकाळ सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत असेल. हा आदेश 10 मेपासून लागू होणार आहे. भारत सरकारने यासंदर्भात यापूर्वीच अधिसूचना जारी केलीय.

दस्तऐवज ऑनलाईन सबमिट करा

एलआयसीच्या मते, विमा पॉलिसी खरेदी करणे, प्रीमियम भरणे, कर्जासाठी अर्ज करणे, कर्ज आणि कर्जाचे व्याज परतफेड करणे, पत्ता बदलणे, एनईएफटीशी संबंधित नोंदणी, पॅनचे तपशील अद्ययावत करणे यांसारख्या अनेक ऑनलाईन सुविधा घेण्यासाठी www.licindia.in या संकेतस्थळाला भेट द्या.

मार्चमध्येही सुविधा देण्यात आली होती

मार्चमध्येही एलआयसीने एक परिपत्रक काढले होते की, दाव्यांचा तोडगा सुलभ होईल. कोरोना साथीच्या काळात पॉलिसीधारकांचा त्रास कमी करण्यासाठी जीवन विमा महामंडळाने (LIC) म्हटले आहे की, पॉलिसीधारक महिन्याच्या अखेरीस देशाजवळील कोणत्याही एलआयसी कार्यालयात पॉलिसी मॅच्युरिटीचा हक्क सांगणारी कागदपत्रे सादर करू शकतात. एलआयसीने सांगितले की, देशभरात त्यांची 113 क्षेत्रीय कार्यालये, 2,048 शाखा, 1,526 छोटी कार्यालये आहेत. याशिवाय यामध्ये 74 ग्राहक झोन आहेत, जिथे पॉलिसीधारकांकडून त्यांच्या पॉलिसीचे मॅच्युरिटी क्लेम फॉर्म स्वीकारले जातील. यामध्ये कोणत्याही शाखेतून घेतलेल्या पॉलिसीवर दावा सांगण्याचे प्रकार कोठेही सादर करता येतील. एलआयसीकडे सध्या 29 कोटींपेक्षा जास्त पॉलिसीधारक आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या