Ticker

6/Breaking/ticker-posts

'हा' आहे यंदाचा IPL चॅम्पियन ...!

 






ट्रॉफी अखेर कोरोनाची ! 

IPL स्पर्धा रद्द



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


नवी दिल्ली :कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अखेर आयपीएलचे पूर्ण सीझन स्थगित करण्यात आले आहे. 7 खेळाडूंसह काही स्टाफ मेंबर्सला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. अशात आयपीएलचे सीझन रद्द करावे अशी मागणी सगळीकडून केली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट बोर्डाने आयपीएल सस्पेंड करण्याचा निर्णय घेतला आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानात PSL ची सुरुवात झाली होती, पण 6 खेळाडूंसह 8 जण कोरोना संक्रमित झाले होते. तेव्हा पाकिस्तानने अचानक पीएसएल गुंडाळण्याचा निर्णय घेतला. पण, आयपीएलमध्ये 7 क्रिकेटर्सला कोरोना झाल्यानंतरही BCCI कसली वाट पाहत आहे असा सवाल उपस्थित केला जात होता. तत्पूर्वी आयपीएलचे सामने एकाच ठिकाणी मुंबईतील 3 मैदानांवर घेणार अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु, वाढत्या दबावानंतर अखेर आयपीएलचे सीझन सस्पेंड करावे लागले आहे.

रिपोर्ट्सनुसार, चेन्नईचे बॉलिंग कोच लक्ष्मीपती बालाजीसह दोन स्टाफ मेंबर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याशिवाय, किंग्स इलेवन पंजाबमधील एका खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. IPL मध्ये सुरुवातीपासून आतापर्यंत सात खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी KKR चा वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापूर्वी, नीतीश राणा (KKR), अक्षर पटेल (DC), डेनियल सैम्स (RCB), एनरिक नॉर्खिया (DC) आणि देवदत्त पडिक्कल (RCB) ला कोरोनाची लागण झाली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या