लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नवी दिल्लीः जगात सर्वात मोठी लस मोहीम
भारतात सुरू आहे. या लस साठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. कुणाला काही अडचण येत
असेल तर कोविन पोर्टल वर एक खास नवीन फीचर जोडले गेले आहे. काही युजर्संच्या
तक्रारीनंतर पोर्टलवर वॅक्सिनेशन सर्टिफिकेट जनरेट होत आहे. या प्रॉब्लेमला
संपवण्यासाठी आता युजर्संना एक सिक्योरिटी कोड पाठवले जात आहे. आता या कोडविना
कोविन पोर्टलवरून लस बुक करणाऱ्यांना लस दिली जाणार नाही. लस घेतेवेळी हा कोड
दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
म्हणून सरकारकडून हा
बदल
केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय (Ministry of Health and Family Welfare) ने
सांगितले की, काही लोकांच्या तक्रारी होत्या की, लस साठी अपॉइंटमेंट घेतली होती. परंतु, वेळेत लस
घेण्यासाठी गेले नाही. परंतु, एसएमएस द्वारे त्यांना
सांगितले की, त्यांचा लसीचा एक डोस पूर्ण झाला आहे. या अशा
तक्रारीनंतर कोविन पोर्टलला एक नवीन फीचर जोडले आहे. आता वॅक्सिनेशन केंद्रावर लस
लावण्यासाठी जाताना हा चार आकडी कोड विचारला जाईल. त्यानंतर तो कोड त्या ठिकाणी
सबमिट केला जाईल. त्यानंतर लसीची प्रक्रिया सुरू केली जाईल.
CoWin Portal वर
कोविड वॅक्सीनसाठी अशी घ्या अपॉइंटमेंट
* सर्वात आधी ब्राउजर मध्ये जाऊन cowin.gov.in वेबसाइट
ओपन करा.
* आता स्क्रीनवर वरच्या बाजुला Register/Sign In yourself लिहिलेले दिसेल. या ठिकाणी क्लिक करा.
*आता यानंतर Register or SignIn for Vaccination च्या
खाली आपला दहा अंकी मोबाइल नंबर टाइप करा.
* आता यानंतर एक ओटीपी येईल. त्याला एन्टर करा.
* ओळखपत्रांची माहिती त्यात भरा. लस घेताना ते सोबत घेऊन जा.
0 टिप्पण्या