लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर - नगर जिल्ह्यातील रुग्णांची दैनंदिन आकडेवारी वाढतीच आहे. त्यामुळेच समाजबांधवांनी रमजान ईदचा सण साधेपणाने, आपापल्या घरी व गोरगरीबांना मदत करून साजरा करावा. शासन नियमांचे पालन करावे, असे आवाहन मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती, अ.नगरचे उपाध्यक्ष डॉ. मुफ्ती अल्ताफ यांनी केले आहे.
कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवरही रमजानचे पवित्र उपवास मुस्लिम समाज बांधव मोठ्या उत्साहात करीत आहेत. यानिमित्त पवित्र नमाज प्रत्येकजण घरीच अदा करीत आहेत. कोरोनामुळे राज्यात, देशात व जगात सगळीकडेच हाहा:कार माजला असून, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे.
रमजान सणानिमित्त कोणीही एकमेकांकडे न जाता आपापल्या घरीच सण साधेपणाने साजरा करावा. कोणत्याही प्रकारची खरेदी करू नये, त्याऐवजी गोरगरीबांना मदत करावी. एकमेकांना दिल्या जाणार्या शुभेच्छा प्रत्यक्ष न भेटता मोबाईलवर अथवा दूरध्वनीवरून द्याव्यात.
कोरोना योद्धे व प्रशासन कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करीत आहेत. मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोनामुक्तीसाठी प्रार्थना करावी. प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करावे. सर्वांनी नियमांचे पालन केल्यास लवकरच आपला जिल्हा कोरोनाला आळा घालू, असा विश्वास डॉ. मुफ्ती अल्ताफ व्यक्त केला आहे.
0 टिप्पण्या