Ticker

    Loading......

पाच लाखाच्या बोलेरो जीपसह सराईत आरोपी जेरबद ..!

नगर तालुका पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी






कामरगाव येथे अपघात करून दोन व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सराईत आरोपीच्या पाच लाखाच्या बोलेरो वाहनासह  नगर तालुका पोलिस स्टेशनचे पथकाने मुसक्या आवळल्या (छाया : सोहेल मनियार)


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर : तालुक्यातील कामरगाव येथे अपघात करून दोन व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला रेकॉर्डवरील सराईत आरोपी उमेश उर्फ ओंकार मधुकर शिंदे (रा. पिंपरीआंतरवन जि.बीड ) यास सापळा लावूूून नगर तालुुुुका पोलिसांनी बोलेरो जीपसह शिताफीने जेरबंद केले .

 याबाबत अधिक माहिती अशी की . नगर तालुका पोलिस स्टेशन हद्दीमध्ये    आरोपीने त्याच्या ताब्यातील चोरीचे वाहन   (क्रमांक एम एच बारा एच एन ८४६२ )  हे रस्त्याने भरधाव वेगात चालून दोन व्यक्तींचा अपघात करून  आरोपी फरार झाला होता.

मिळालेल्या बातमीनुसार नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस उपनिरीक्षक  जारवाल,पो.ना.राहुल शिंदे,पो. ना.अशोक मरकड,महिला पो.ना.प्रमिला गायकवाड,पो.कॉ. धर्मराज दहिफळे नगर तालुका पोलीस स्टेशन यांचे पथकाने आरोपी नामे उमेश उर्फ ओंकार मधुकर शिंदे रा. पिंपरी आंतरवन जि.बीड यास अपघातातील वाहन क्रमांक एम एच १२ एच एन ८४६२ सह दिनांक १०/५/२०२१ रोजी ताब्यात घेतले आहे.

सदरच्या गुन्ह्यात अपघातातील वाहन हे आरोपीने हिंजवडी येथील गोदरेज कंपनी समोरून चोरून आणल्याची कबुली दिली असून त्याबाबत हिंजवडी पोलीस स्टेशन जिल्हा पुणे येथे गु.र.न. ३२५/२०२१ भा.द.वि.क.३७९ गुन्हा दाखल आहे .  पाच लाखाची बोलेरो वाहनासह आरोपी मिळून आला आहे. विरुद्ध बीड शहर,नगर तालुका पोलीस स्टेशन, बीड ग्रामीण,शिवाजीनगर, हिंजवडी पोलीस स्टेशन आदी ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपी कडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.  

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल,उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील,पोलिस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस उपनिरीक्षक जारवाल,पो.ना. राहुल शिंदे,पो.ना. अशोक मरकड,महिला पो. ना.प्रमिला गायकवाड,पो.कॉ. दहिफळे नगर तालुका पोलीस स्टेशन यांचे पथकाने केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप करीत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या