Ticker

6/Breaking/ticker-posts

करुणा धनंजय मुंडेंची प्रेमकथा.. लवकरच येणार, फेसबूक पोस्टमधून मोठी घोषणा

 







लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क   )

मुंबई : बीडचे पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची प्रेमकथा आता पुस्तकाच्या रुपात सगळ्यांसमोर येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांच्या जोडीदार करुणा धनंजय मुंडे या लवकरच एक पुस्तक प्रकाशित करणार असून यामध्ये त्या आपली प्रेमकथा सांगणार असल्याची माहिती आहे. या बातमीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

अधिक माहितीनुसार, धनंजय मुंडे करुणा मुंडे यांनी फेसबूकवर एक पोस्ट करत याची घोषणा केली आहे. त्यामुळे या पुस्तकातून धनंजय मुंडे यांच्या आयुष्यातल्या आणखी कोणत्या गोष्टी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. इतकंच नाहीतर याचा त्यांच्या राजकीय आयुष्यावर काही परिणाम होणार का याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे.

काय लिहलं आहे फेसबूक पोस्टमध्ये?

' Karunadhananjaymunde माझ्या जीवनावर आधारीत सत्य प्रेम जिवनगाथा लवकर प्रकाशन प्रकाशित होण्याच्या मार्गावर असुन त्याचे प्रकाशन लवकर केले जाणार आहे' असं करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी एक फोटोही शेअर केला असून त्यामध्ये एक आश्चर्यजनक प्रेमकथा असंही त्यावर लिहण्यात आलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या