Ticker

6/Breaking/ticker-posts

९ लाख वाचकसंख्या..! वाचकांचे मन:पूर्वक आभार..

 


 बातमी.. मग ती बरी-वाईट कोणतीही असो, समाज जीवनाचा एक घटक बनून राहिली आहे.  सभोवताली घड्णा-या घटना घडामोडींची माहिती प्रत्येकाला जाणून घेण्याची उत्सूकता असते. काळाच्या ओघात माहितीच्या साधनामध्ये अमुलाग्र परिवर्तन घडून आले. माहिती तंत्रातील क्रांतीने अवघ जग मानवाच्या मुठ्ठीत  सामावाल आहे. आज जगातील कोणत्याही ठिकाणची बातमी काही मिनिटात उपलब्ध होत आहे.  सध्या वर्तमानपत्र, टि.व्ही, विविध चॅनेल्सना आव्हान देत सोशल मीडियाचा अविष्कार सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य अंग बनला आहे. त्यामुळे अभिव्यक्तिस्वातंत्र्याला (अतिरंजित, बिभत्स,अश्लिल, अन्‍ स्वैर विचारांचा अपवाद)  धुमारे फुट्ले आहेत.

 

गेल्या दोन-अडीच दशकाच्या पत्रकारितेतील अनुभवाच्या शिदोरीवर जानेवारी २०२१ पासून लोकनेता न्यूज हे ऑनलाईन न्यूज पोर्ट्ल सुरु केले. जनसामान्यांच्या प्रश्नाना वाचा फोडत चौफेर बातमीदारी केली.  सत्य, घट्ना-घडामोडींचे  सर्वव्यापी, सर्वस्पर्शि असे वार्तांकन केले.  ते वाचकानाही मनोमन भावले.  त्यामुळे वाचकानी उदंड प्रतिसाद देत अल्पावधित  ९ लाख  व्हियुज मिळ्वुन दिले.  त्याबध्द्ल तमाम वाचकांचे आम्ही खरोखरच मनापासून ऋणी आहोत. या बहुमुल्य सह्कार्याबद्द्ल मन:पूर्वक आभार..  शतश: धन्यवाद...!

दिलगीरी

आपणा सर्वांच्या पाठ्बळावर अल्पावधित ९ (नऊ ) लाख वाचकसंख्या गाठणारे लोकनेता न्यूज या लोकप्रिय पोर्ट्लची सेवा गेले काही दिवसांपासून तांत्रिक अड्चणीमुळे खंडीत झाली आहे. आणखी काही काळ ती विस्कळीत राहणार असल्याने वाचकांच्या होणा-या गैरसोईबद्द्ल आम्ही दिलगीर आहोत.

धन्यवाद...!

                                                                      -संपादक

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या