लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई: झपाट्यानं फैलावणारा करोनाचा संसर्ग व
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनची
मुदत १५ मे रोजी संपत आहे. मुंबईत रुग्णसंख्या आटोक्यात असली तरी राज्याच्या
ग्रामीण भागात संसर्ग वाढत आहे. त्यामुळं लॉकडाऊनचं काय होणार याबाबत अनेकांच्या
मनात प्रश्न आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज याबाबत खुलासा केला. (मुंबईत
घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
'राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज होण्याची शक्यता आहे. अद्याप तशी नोटीस आलेली
नाही. मात्र, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
व मंत्रिमंडळातील सर्व सहकारी चर्चा करून त्याबाबत निर्णय घेतील. येत्या १५ मे
पर्यंत लॉकडाऊन आहे. 'ब्रेक द चेन' अंतर्गत आपण जे निर्बंध घातले
आहेत, ते वाढवायचे की त्यातले काही निर्बंध कमी करायचे यावर
मंत्रिमंडळात निर्णय होऊ शकतो,' असं टोपे म्हणाले.
सध्या असलेले निर्बंध हळूहळू शिथील होतील, असा माझा अंदाज आहे. लगेचच १०० टक्के मोकळीक दिली जाईल किंवा १०० टक्के
सगळं खुलं होईल, अशी अपेक्षा कोणी करू नये. तसं होणार नाही.
त्यावर चर्चा होईल. त्यानंतर मुख्यमंत्री निर्णय जाहीर करतील,' असं टोपे यांनी सांगितलं.
0 टिप्पण्या