लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नवी दिल्लीः देशात करोनाची तिसरी लाट अटळ असल्याचं केंद्र सरकारच्या शास्त्रज्ञांच्या गटाचे मुख्य सल्लागार विजय यांनी म्हटलं होतं. पण आज राघवन यांनी पुन्हा माहिती दिली आहे. करोनासंबंधी काळजी घेतली तर आपण करोनाची तिसरी लाट रोखू शकतो, असं ते म्हणाले. सर्वांनी नियमांचं आणि सूचनांचं पालन केलं तर काही ठिकाणीच करोनाची तिसरी लाट येईल, नाहीतर येणारही नाही, असं राघवन म्हणाले.
करोनाची तिसरी लाट अटळ आहे. कारण करोना व्हायरस आपलं रुप बदलत आहे, असं दोन दिवसांपूर्वी राघवन म्हणाले होते. आपण
सर्वजण करोनासंबंधी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन केल्यास
आणि योग्य खबरदारी घेतल्यास करोनाची तिसरी लाट आपण रोखू शकतो. हे ऐकणं आणि बोलणं
आपल्याला थोडं अवघड वाटतंय. पण हे शक्य आहे. खबरदारी घेतली, कंन्टेन्मेंट, टेस्टींग आणि ट्रीटमेंटसह देखरेख
ठेवून मार्गदर्शक सूचनांचे पालन केल्यान तिसरी लाट रोखणं अवघड नाही, असं राघवन यांनी सांगितलं.
जगभरात आणि भारतात वेगवेगळ्या ठिकाणी
वेगवगेळ्या वेळी करोना रुग्णांची संख्या टिपेला पोहोचली आहे. यामुळे कधी आणि का
संसर्ग वाढतो हे समजून घेणंही महत्त्वाचं आहे. करोनाला संधी मिळाली की संसर्ग
वाढतो. पण संसर्गाची संधी न मिळाल्यास प्रादुर्भाव वाढणार नाही, असं राघवन यांनी स्पष्ट केलं.
ज्यांनी लस
घेतली आहे, मास्क
घालत आहेत आणि ते पूर्ण खबरदारी घेत आहेत असे सर्वजण सुरक्षित आहेत. पण व्हायरसला
संधी मिळाली तर रुग्ण संख्येत वाढ होणारच. असेही अनेक नागरिक आहेत की जे आधी पूर्ण
काळजी घेत होते. पण आता ते निष्काळजी झाले आहेत. अशा परिस्थिती रुग्ण वाढणार.
करोनाचा प्रादुर्भाव रोखणं आणि त्याच्या संसर्गाचा वेग कमी करणं हे आपल्या हातात
आहे. लक्षणं नसलेल्या अनेक नागरिकांमुळे इतरांना संसर्ग होत आहे. यामुळे अधिक
खबरदारी घेण्याची गरज आहे, असं राघवन यांनी सांगितलं.
0 टिप्पण्या