Ticker

6/Breaking/ticker-posts

ईदच्या दिवशी सलमान खानला झटका, काही वेळातच 'राधे' चित्रपट ऑनलाइन लीक

 









लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क   )

मुंबई- बॉलिवूड अभिनेता सलमान खानने आपला शब्द पाळत १३ मे म्हणजेच ईदच्या दिवशी  'राधे' चित्रपट प्रदर्शित केला. सलमानच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते परंतु, प्रदर्शनाच्या काही तासांतच 'राधे' अनधिकृत वेबसाइट्सवर लीक झाला. त्यामुळे चाहत्यांमध्ये एकच गोंधळ पाहायला मिळाला. सलमानने चाहत्यांना 'राधे' चित्रपट योग्य प्लॅटफॉर्मवर पाहण्याची विनंती केली होती. परंतु, 'राधे' देखील पायरसीचा शिकार झाला आणि ऑनलाइन लीक करण्यात आला.

चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या एक दिवसआधी सलमानने एक व्हिडीओ ट्वीट करत चाहत्यांना चित्रपट झी ५ वर पाहण्याची विनंती केली होती. त्याने ट्वीटमध्ये म्हटलं की, 'एक चित्रपटाच्या निर्मितीमागे अनेक लोकांची मेहनत असते. आम्हाला खूप दुःख होतं जेव्हा लोक पायरसी करून चित्रपट बघतात. मी तुम्हा सगळ्यांकडे हे वचन मागतो की तुम्ही चित्रपट योग्य प्लॅटफॉर्मवरच बघाल. या ईदला होणार प्रेक्षकांची कमिटमेन्ट. नो पायरसी इन एण्टरटेनमेन्ट' असं लिहीत सलमानने चाहत्यांना आवाहन केलं होतं. इतके प्रयत्न करूनही चित्रपटाची पायरसी करण्यात आली.

त्यामुळे काही वेबसाइटवर चित्रपट ऑनलाइन पाहता येऊ शकतोय आणि डाउनलोडही करता येतोय. चित्रपट ऑनलाइन लीक झाल्याने सलमानचे चाहते मात्र प्रचंड रागावले आहेत. ते चित्रपटाच्या टीमकडे पायरसी करणाऱ्या वेबसाइट्सवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. याशिवाय चाहते इतर प्रेक्षकांना झी ५ वर चित्रपट पाहण्याची विनंती करत आहेत. पायरसी करण्यात आलेला सलमानचा हा पहिलाच चित्रपट नसून यापूर्वीही सलमानचे अनेक हिट चित्रपट ऑनलाइन लीक करण्यात आले होते. परंतु, त्याचा चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर फारसा फरक पडला नव्हता. प्रेक्षक सलमानचे चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहणं जास्त पसंत करत होते. परंतु, 'राधे' मुळातच ऑनलाइन प्रदर्शित झाल्याने या चित्रपटाच्या कमाईवर त्याचा परिणाम पाहायला मिळू शकतो.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या