Ticker

6/Breaking/ticker-posts

रोहित पवार यांनी करोना बाधित रुग्णांना जेवण वाढले अन..

 






लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

जामखेड :कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना औषधोपचारासोबतच मानसिक आधाराची गरज असते. मात्र, त्यांच्या नातेवाईकांना यासंबंधी मर्यादा येतात. ही बाब लक्षात घेत कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला. जामखेड येथील आरोळे हॉस्पिटलमधील कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन त्यांनी रुग्णांना धीर दिला आणि स्वत: रुग्णांना जेवणही वाढले.

आरोळे कोविड केअर सेंटरचे संचालक डॉ. रवी आरोळे, पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यावेळी उपस्थित होते. अनेकदा करोना रुग्णांकडे त्यांचे नातेवाईक फिरकत नाहीत. ग्रामीण भागातील रुग्ण यामुळे मानसिक दृष्ट्या खचतात. आजारापेक्षा कोणी जवळ फिरकत नाही आपणास मोठा आजार झाला आहे, असे लोकांना वाटते. म्हणूनच आमदार पवार यांनी आरोळे कोविड सेंटरमधील करोना रुग्णांशी संवाद साधला. त्यांना जेवण वाढून विचारपूस केली. रुग्णांना धीर देण्याचा प्रयत्न केला.


आमदार पवार यांच्या पुढाकारातून कर्जत, जामखेड आणि नगर शहरातही कोविड केअर सेंटर उभारण्यात आली आहेत. तेथे शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत. आपल्या मतदार संघातील आमदार स्वत: जेवण वाढत असून विचारपूस करीत आहे, हे पाहून रुग्णांना दिलासा मिळाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या