लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
श्रीरामपूर:- अहमदनगर
जिल्ह्यात करोनाचा परिस्थिती गंभीर होण्यास पालकमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधी जबाबदार
आहेत. त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी
करीत श्रीरामपूरमध्ये महाराष्ट्र नव निर्माण सेनेतर्फे मुंडन आंन्दोलन करण्यात आले. महात्मा गांधी
यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या देत कार्यकर्त्यांनी मुंडण करून घेतले.
यावेळी जिल्हाध्यक्ष शिंदे म्हणाले, ‘नगर जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या
वाढत आहे. अनेक नागरिकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही. ज्यांना बेड मिळाले
त्यांना इंजेक्शन, ऑक्सिजन मिळत नाही. अनेक तालुक्यांमध्ये
व्हेंटिलेटरच उपलब्ध नाही. अशा गंभीर परिस्थितीत नगर जिल्ह्याचे पालकत्व
स्वीकारणारे पालकमंत्री व जिल्ह्याचे इतर दोन मंत्री खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष,
पंचायत समिती सभापती व सर्व ग्रामपंचायत सरपंच यांच्याकडून
रुग्णांना कुठल्याही प्रकारची मदत व सहकार्य मिळत नाही. त्यामुळे करोनामुळे अनेक
नागरिकांचे मृत्यू झालेले आहेत. त्यास या जबाबदार म्हणून पालकमंत्री यांच्यासह
सर्व प्रमुख लोकप्रतिनिधींवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावे. आमचे मायबाप
सरकार मेले असे वाटत असल्याने त्यांचे श्राद्ध घालून आजचे मुंडण आंदोलन करण्यात
आले आहे. करोनाग्रस्त व त्यांच्या नातेवाईकांना लोकप्रतिनिधींनी यापुढे मदत न
केल्यास प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या घरासमोर जाऊन मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन
करण्यात येईल,’ असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
आंदोलनात जिल्हा सचिव तुषार बोबडे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, तालुका अध्यक्ष गणेश दिवशी, शहर अध्यक्ष सचिन पाळंदे,
कामगार सेना तालुकाध्यक्ष डॉ. संजय नवथर, शेतकरी
सेना तालुकाध्यक्ष गोरक्ष वेळे, प्रसिद्धीप्रमुख स्वप्नील
सोनार, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष राहुल दातीर, शहराध्यक्ष विशाल शिरसाट, कामगार सेना उपचिटणीस नंदू
गंगावणे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या