लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
औरंगाबाद : दहावी विद्यार्थ्यांसमोर गुणपद्धती कशी असणार याची चिंता असतानाच, अकरावीसाठी सीईटी हवी का, नको हे काही तासा तच सांगावे लागणार आहे. शिक्षण विभागाने शनिवारी सायंकाळी ऑनलाइन लिंक पाठवत रविवारपर्यंत मते नोंदवा अशा सूचना केल्या आहेत. राज्यात १७ लाख परीक्षार्थींची संख्या, ग्रामीण भागात इंटरनेट, मोबाइल अशा सुविधांची वाणवा त्यात काही तासात मते नोंदविण्याचे फर्मान शिक्षण विभागाच्या कारभाराचे वाभाडे कारणारे ठरले आहे.
करोनामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात
आल्या. त्यानंतर अकरावीचे प्रवेश कसे द्यायचे असा पेच आहे. त्यासाठी सीईटी घ्यायची
की, नाही असा खल सुरू आहे.
मात्र, शिक्षण विभागाने शनिवारी सायंकाळी लिंक पाठवित
रविवारपर्यंत आपले मते नोंदवा अशा सुचना विद्यार्थ्यांना केल्या आहेत.
शिक्षण विभागाने पाठविलेल्या लिंक सोबत
म्हटले आहे, करोना
प्रादुर्भावामुळे इयत्ता १० वी च्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत, इयत्ता ११ वीच्या वर्गात प्रवेशासाठी गुण देण्यासाठी शालेय शिक्षण
विभागामार्फत एक स्वतंत्र सीईटी परीक्षा घ्यावी काय, सीईटी
परीक्षा राज्यातील सर्व इच्छुक इयत्ता १० वी चे विद्यार्थी देऊ शकतील. सीईटी
परीक्षेचे स्वरूप साधारणत: ओएमआर पद्धतीनुसार असावी, सर्व
विषयांचा मिळून एकत्रित एक पेपर असावा, या पेपरसाठी सुमारे
दोन तासांचा वेळ देण्यात येईल. ही परीक्षा साधारणत: जुलै महिन्यामध्ये किंवा करोना
चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्रत्येक शाळेच्या ठिकाणी घेण्यात यावी असे विचारात
आहे. करोनाविषयक सुरक्षेचे सर्व नियमांचे पालन करून या परीक्षेच्या गुणांच्या
आधारावर इच्छुक विद्यार्थ्यांना गुणात्मक तत्वावर ११ वी मध्ये प्रवेश देता येईल.
राज्यातील अकरावीला प्रवेश घेऊ
इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारणपणे १०० गुणांची ऑफलाईन (प्रत्यक्ष
) प्रवेश चाचणी घेणे प्रस्तावित आहे. याबाबत सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी https://www.research.net/r/11thCETTEST यावर
आले स्पष्ट मत नोंदणी करावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत. ही लिंक शनिवारी
सायंकाळी पाठविण्यात आली आणि लिंक ९ मे रोजी बंद होईल, माहिती
नाही भरल्यास आपण स्वतः सर्वस्वी जबाबदार राहाल.
काही तासात १७ लाख
विद्यार्थी मते कसे नोंदविणार?
काहीतास आधी लिंक पाठवून मते नोंदवा, माहितीन नाही भरल्यास आपण स्वत:
सर्वस्वी जबाबदार राहाल असे सांगणाऱ्या शिक्षण विभागाने १७ लाखांपेक्षा अधिक
विद्यार्थ्यांपर्यंत लिंक कशी पोहचणार याचाही विचार केलेला नाही. शनिवारी सायंकाळी
लिंक देत काही तासात मते नोंदवा असे वॉट्सअप द्वारे कळविण्यात आले. अनेक
विद्यार्थ्यांकडे मोबाइल उपलब्ध नाही. त्यासह अनेक ठिकाणी इंटरनेट सुविधेची अडचण
आहे, अशावेळी शिक्षण विभागाचा हा कारभार विद्यार्थ्यांची परीक्षा
पाहणारा ठरणार आहे. याबाबत मुख्याध्यापकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
“अकरावी प्रवेशासाठीच्या सीईटीबाबत विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन मते
मागवली. राज्यात सोळा लाखांपेक्षाही अधिक विद्यार्थी असले तरी माहिती भरायला एक
मिनीट लागतो, त्यामुळे
काही अडचण नसावी.”
दिनकर टेमकर, संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद
0 टिप्पण्या