Ticker

6/Breaking/ticker-posts

ठाकूर निमगावच्या ८५ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात ; मात्र,आजीने देह ठेवल्याचे शल्य..!

 कुटुंबातील दुःख विसरून जनतेच्या स्वास्थ्यासाठी महिला सरपंचांनी कंबर कसली

* ठाकूर निमगावमध्ये आठ दिवसासाठी जनता कर्फ्यू











लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

शेवगाव (जगन्नाथ गोसावी) :-  ठाकूर निमगाव (ता.शेवगाव) येथील एका ८५ वर्षीय आजोबांनी आत्मबलाच्या जोरावर कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यांचेवर आरोग्य दूतांकडून वेळेत उपचार झाल्याने ते ठणठणीत बरे झाले असून घरी परतले आहेत. मात्र ,साता जन्माची साथ लाभलेल्या सहचारिणीने या जगाचा निरोप घेतल्याचे शल्य त्यांना आहे.

      ठाकूर निमगावचे धडाडीचे युवा कार्यकर्ते संभाजी कातकडे यांचे आजोबा व सरपंच सौ. सुनिता कातकडे यांचे आजेसासरे असलेले देवराव कातकडे (वय ८५) यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना उपचारासाठी शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांनी अवघ्या सात दिवसात कोरोनाला हरवण्याची किमया साधली आहे.  शुक्रवारी (दिं.३० रोजी) रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

     विशेष म्हणजे त्यांच्या ८० वर्षीय पत्नीलाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांचेवर शेवगावच्या एका खाजगी कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु होते. मात्र, त्यांना दमा व तत्सम आजार असल्याने त्यांची कोरोनाशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

      सध्या ठाकूर निमगावमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणावर असल्याने युवा कार्यकर्ते संभाजी कातकडे व त्यांच्या सरपंच पत्नी सौ. सुनिता कातकडे यांनी कुटुंबातील दुःख बाजूला सारून ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी कंबर कसली आहे. शेवगाव तालुका प्रशासन व स्थानिक कोरोना नियंत्रण समितीच्या सहकार्याने  त्यांनी कोरानाची साखळी (चेन) तोडण्यासाठी ठाकूर निमगावमध्ये आठ दिवसाचा जनता कर्फ्यू लागू केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या